सातारा जिल्हा सरकारी नोकर पतपेढीच्या चेअरमनपदी श्री. संजय बैलकर यांची बिनविरोध निवड


संस्थेच्या आर्थिक उत्पन्न

वाढीसाठी संचालक मंडळ

प्रयत्नशील राहील : नूतन

चेअरमन संजय बैलकर

सातारा जिल्हा सरकारी नोकर पतपेढीच्या चेअरमनपदी श्री. संजय बैलकर यांची बिनविरोध निवड

सातारा : सातारा जिल्हा सरकारी नोकर पतपेढी संस्थेचे कामकाज हे सहकार कायद्यान्वये सभासद व संस्थेचे हित जोपासून केले जाईल. संस्थेच्या उत्पन्नामध्ये भरीव वाढ करून सभासदांना जास्तीत जास्त लाभांश देण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही नूतन चेअरमन संजय बेलकर यांनी दिली. 

सातारा जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी सातारा या संस्थेच्या चेअरमनपदी तहसिल कार्यालय जावली येथे सहाय्यक महसूल अधिकारी श्री. संजय बैलकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील मा. अध्यासी अधिकारी श्री. प्रशांत आडे यांच्या हस्ते नूतन चेअरमन संजय बैलकर यांचा शाल व बुके देवून सत्कार करण्यात आला. 

सातारा जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी सातारा या संस्थेची स्थापना १६ ऑगस्ट, १९२९ रोजी झाली असून, संस्थेस ९६ वर्ष पूर्ण झाली आहेत. संस्थेचे भागभांडवल रु. ३५ कोटींचे असून वार्षिक उलाढाल रु. ४४ कोटींची आहे. संस्थेस लेखापरिक्षण अ वर्ग प्राप्त झाले असून मागील वर्षी रु. १ कोटी ६८ लाख नफा झालेला आहे.

नूतन चेअरमन श्री. संजय बैलकर यांनी पदभार स्वीकारताना सर्वांचे सहकार्य व मार्गदर्शनाची अपेक्षा व्यक्त केली. संस्थेचे कामकाज हे सहकार कायद्यान्वये सभासद व संस्थेचे हित जोपासून केले जाईल. संस्थेच्या उत्पन्नामध्ये भरीव वाढ करून सभासदांना जास्तीत जास्त लाभांश देण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही नूतन चेअरमन संजय बेलकर यांनी दिली. तसेच सभासदांच्या आर्थिक गरजा भागविणे, कमीत कमी व्याज दरात जास्तीत जास्त कर्ज पुरवठा करण्यासाठी प्रयत्नांचा एक भाग म्हणून आजपासून संस्थेच्या मध्यम मुदत कर्जाची मर्यादा रुपये १ लाख करण्यात आल्याची घोषणा संजय बैलकर यांनी केली.

यावेळी संस्थेचे व्हाइस चेअरमन श्री. सुनिल सावंत, जेष्ठ संचालक श्री. जयंत वीर, श्री. चंद्रकांत कांबिरे, संचालक श्री. सागर कारंडे, श्री. विक्रमसिंह मोहिते, श्री.विनायक पाटील, श्री. दिलीप जानकर, सौ. सुनिता रेडेकर, सौ. संगिता कणसे, श्री. संदिप गार्डे, श्री. विक्रम शिंदे, श्री. नितीन क्षीरसागर, श्री. नितीन मोहिते, श्री. सुरेश जाधव व श्री अशोक गोळे आदी संचालक उपस्थित होते. संस्थेचे व्यवस्थापक श्री. विनोद चव्हाण यांनी कर्मचाऱ्यांच्या वतीने नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. सभा खेळीमेळीत अत्यंत आनंददायी व उत्साही वातावरणात पार पडली.

Post a Comment

0 Comments