पत्रकारितेतील ’राजा माणूस’ : वरिष्ठ संपादक राजा माने साहेब

 


पत्रकारितेतील 'राजा माणूस' :

वरिष्ठ संपादक राजा माने साहेब

महाराष्ट्र राज्यासह गोव्यात डिजिटल मीडिया धोरण राबविण्यासाठी पायाला भिंगरी

ग्रामीण भागातील पत्रकारांना खऱ्या अर्थाने न्याय देण्यासाठी प्रयत्नशील

कराड : महाराष्ट्राच्या पत्रकारितेत चांदा ते बांदा एकच नावाची चर्चा आहे ती वरिष्ठ संपादक व डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने साहेबांची..! गेली ३८ वर्षे प्रथितयश दैनिकात राजकीय संपादक, वरिष्ठ संपादक म्हणून काम केलेल्या या व्यक्तीला सेवानिवृत्ती काळात निवांत राहता आले असते. मात्र, राजा माने साहेब यांनी राज्यभरातील डिजिटल मीडियामध्ये काम करणाऱ्या पत्रकारांच्या कल्याणासाठी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना उभी करून आमच्यासारख्या ग्रामीण भागातील पत्रकारांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.

पत्रकार उद्योजकीय हवा..! मात्र खंडणीखोर पत्रकाराला समाज मान्यता नको..! हेच साहेबांचे रोखठोक धोरण...

आदरणीय राजा माने साहेबांनी आयुष्यभर अत्यंत प्रामाणिक तत्वे पाळत पत्रकारितेचा वसा जपला आहे. आजही प्रत्येक महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई व कोकण या सर्वच विभागातील जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात मा. राजा माने साहेबांच्या वर प्रेम करणारा पत्रकार, संपादक व सामान्य नागरिक आहे.  

डिजिटल मीडियामध्ये काम करणाऱ्या पत्रकाराला न्याय मिळाला पाहिजे, या हेतूने आदरणीय साहेबांची अहोरात्र धडपड सुरू आहे. मात्र, डिजिटल मीडियामध्ये काम करणारा पत्रकार हा उद्योजकीय असला पाहिजे, मात्र तो खंडणीखोर असता कामा नये ही रोखठोक भूमिका साहेबांनी मांडल्यामुळे खऱ्या पत्रकारांना न्याय मिळत आहे.

महाराष्ट्रात पत्रकारांच्या अनेक संघटना आहेत. मात्र, ग्रामीण भागापासून मोठ्या शहरापर्यंतच्या सर्व पत्रकार संपादकांना सर्वांना एक कुटुंब म्हणून एकत्र आणण्याचे काम आदरणीय राजा माने साहेब करीत आहेत. आता गरज आहे ती सर्वांनी एकजुटीने एकत्र राहून आदरणीय राजा माने साहेबांच्या पाठीशी ताकद उभी करण्याची व डिजिटल मीडियाला राजमान्यता मिळवून आपण सक्षम होण्याची.

शब्दांकन : विकास भोसले,कराड 9371464551

vikasbhoalsale76@gmail.com

Post a Comment

0 Comments