आता वयाच्या या टप्प्यावर
संघर्ष समिती काढून
काय होणार ?
राष्ट्रवादीचे आमदार सचिन कांबळे-पाटील यांची राष्ट्रवादीच्या नेत्यांवरच नाव न घेता टीका
उत्तर कोरेगावात पहिला ऐतिहासिक जनता दरबार
सातारा : “गेल्या ३० वर्षांपासून तेच लोक सत्तेत होते. १५ वर्षे आमदार होते, मंत्रीपदही मिळाले. पण त्या काळात त्यांनी संघर्ष समित्या काढल्या नाहीत, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले नाहीत. आता वयाच्या या टप्प्यावर संघर्ष समिती काढून काही होणार नाही. तुम्ही लढा उभा करा, काम आम्ही करू. आमच्याकडे लोकांच्या समस्या सोडवण्याची तातडीची भावना आहे, असे मत व्यक्त करून माजी सभापती राष्ट्रवादीचे नेते (ap) रामराजे नाईक- निंबाळकर यांच्यावर घणाघात केला.
फलटण-कोरेगावचे आमदार सचिन कांबळे पाटील यांच्या पुढाकाराने वाठार स्टेशन येथील राधेकृष्ण मंगल कार्यालयात जनता दरबार पार पडला यावेळी उत्तर कोरेगावातील 26 गावातील शेकडो नागरिकांनी हजेरी लावली होती. या विशेष जनता दरबारात जिल्ह्यातील सर्व प्रमुख शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते. नागरिकांकडून आलेल्या एकूण ११० अर्जांपैकी ८० टक्के अर्जांवर तात्काळ निर्णय घेण्यात आला. ही या उपक्रमाची मोठी यशोगाथा ठरली. अर्ज वाचून, त्यावर लगेच कृती केल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होते. उत्तर कोरेगाव तालुक्याच्या इतिहासात प्रथमच आयोजित केलेल्या जनता दरबाराने लोकशाही सहभागाचा नवा आदर्श उभा राहिला आहे.
जनता दरबारात उपस्थित नागरिकांनी पाणी, रस्ते, वीज, शेतकरी योजनांसह विविध समस्यांकडे लक्ष वेधले. यावर अधिकाऱ्यांनी तत्परतेने कारवाई करून निर्णय दिले. यामुळे शासकीय यंत्रणांबद्दलचा विश्वास वाढल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.
एक नवीन कार्य संस्कृतीची सुरुवात
उत्तर कोरेगावसारख्या ग्रामीण भागात जनता दरबाराच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी आणि प्रशासन थेट जनतेसमोर येत असल्याने, कार्य संस्कृतीतील पारदर्शकतेची नवी पायाभरणी होत आहे. हा दरबार केवळ समस्यांचे निवारण करणारा नव्हे, तर लोकशाहीला अधिक बळकटी देणारा उपक्रम ठरला आहे. नागरिकांनी या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले असून, "जनतेसाठी चालणारी सत्ता कशी असते" याचा अनुभव आम्हाला मिळाला," असे मत अनेकांनी व्यक्त केले.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!