पंतप्रधान आयुष्मान भारत
महाराष्ट्र मिशन समितीचे
प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे
यांना DMEJचे निमंत्रण
सावंतवाडी येथे ६ एप्रिल रोजी होणाऱ्या डिजिटल मीडिया संघटनेच्या महाअधिवेशनात सहभागी होणार
मुंबई : डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रच्या सावंतवाडी येथे ६ एप्रिल २०२५ रोजी भोसले नॉलेज सिटी संकुलात होत आहे. या तिसऱ्या महाअधिवेशनाचे निमंत्रण पंतप्रधान आयुष्मान भारत महाराष्ट्र मिशन समितीचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे यांना दिले आहे. ते महाअधिवेशनात सहभागी होणार आहेत. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने व उपाध्यक्ष सतीशभाऊ सावंत यांनी नुकतीच डॉ. ओमप्रकाश शेटे यांची भेट घेऊन निमंत्रण दिले आहे.
संघटनेचे निमंत्रण डॉ. शेटे यांनी स्वीकारले तसेच पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्य विषयक प्रश्नांमध्ये योग्य ती मदत करण्याची भावना व्यक्त केली. यावेळी पंतप्रधान आयुष्मान भारत मिशनच्या देशात आणि महाराष्ट्रात चाललेल्या वाटचालीची माहिती त्यांनी दिली. राजा माने यांनी राज्यातील डिजिटल पत्रकारांच्या अडचणी व संघटनेच्या आजवरच्या वाटचालीबद्दल डॉ. ओमप्रकाश शेटे यांना माहिती दिली.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!