सातारा भाजपाकडून
आमदार अबू आझमी यांच्या
फोटोला शेण फासून
जोडे मारून निषेध
सातारा : समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचा शत्रू, धर्मवीर श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज यांचे हाल हाल करून हत्या करणाऱ्या, हिंदुद्वेष्टया औरंगजेबाचे कौतुक केले, त्याचे उदात्तीकरण केले याचा निषेध म्हणून भारतीय जनता पार्टीतर्फे साताऱ्यात पोवई नाका येथे अबू आझमी यांच्या फोटोला शेण फासण्यात आले. तसेच जोडे मारून फोटो पेटविण्यात आला.
अबू आझमी याचे विधानसभा सत्रातून विलंबन केले असले तरी ते पुरेसे नाही, त्याची आमदार पदावरून हकलपट्टी करावी. एवढेच नव्हे तर औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्या अबू आझमीबरोबरच त्याच्या सर्व पिलावळीला उत्तर प्रदेशात हाकलून द्यावे, त्या ठिकाणी त्यांचा व्यवस्थित हिशोब ठेवून कार्यक्रम करण्यात येईल, अशी मागणी भारतीय जनता पार्टीतर्फे करण्यात आली.
या वेळी सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष चिन्मय कुलकर्णी, सातारा जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, मनीषा पांडे, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे, अनु जाती मोर्चा प्रदेश सचिव शैलेंद्र कांबळे, अनु जमाती मोर्चा प्रदेश सचिव सदाशिव नाईक, माजी नगरसेवक किशोर पंडित, चंदन घोडके, युवराज मोरकर, अश्विनी हुबळीकर, रोहिणी क्षीरसागर, संगीता जाधव, विजय नायक, अविनाश खर्शीकर, अमित काळे, संदीप वायदंडे, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस अमोल कांबळे , रोहित सावंत, जिल्हा उपाध्यक्ष लिंबाजी सावंत, रोहित किर्दत, विक्रम बोराटे, सनी साबळे, तेजस कदम, प्रशांत जाधव, रविकिरण पोळ, गौरव मोरे, यशोवर्धन मुतालिक, जिल्हा चिटणीस श्रीधर हादगे, अक्षय चांगण, सोशल मीडिया जिल्हा संयोजक प्रथमेश इनामदार, जिल्हा सहसंयोजक प्रथमेश मोरे, जिल्हा सहसंयोजक युवा वॉरिअर श्रेयस शिंदे , अनिकेत टिंगरे ,रणजीत खाडे, सूरज जाधव आणि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
जावळी भाजपाकडून
आमदार आबू आझमीच्या
प्रतिमेला जोडो मारो आंदोलन
छत्रपती शिवाजी महाराजांना कमी लेखून क्रूर मोगली शासक औरंगजेब याचे उदात्तीकरण केल्याबद्दल भाजपा जावली तालुका यांच्या वतीने समाजवादी पक्षाचे आमदार आबू असीम आझमी यांच्या प्रतिमेला मेढा येथे जोडो मारो आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला.आमदार आबू आझमी यांच्या निलंबनाची कारवाई करण्याची मागणी विधानसभा अध्यक्ष मिलिंद नार्वेकर यांना तहसील कार्यालय मेढा यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
वर्तमान भारत देशाला मुघल, ब्रिटिश, पोर्तुगीज अशा अनेक आक्रमकांकडून झालेल्या धार्मिक, आर्थिक, सामाजिक अत्याचारांचा कटू इतिहास आहे. अशा परकीय विकृत अत्याचाऱ्यांच्या आक्रमनाला तोंड देऊन स्वतंत्र भारत देशाची निर्मिती झाली आहे. महाराष्ट्रातील साधूसंत, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या विचारसरणीचा देशाच्या स्वातंत्र्यात सिंहाचा वाटा आहे. असे असताना महाराष्ट्रातील सामाजिक वातावरण अस्थिर करण्याचं काम समाजवादी पक्षाचा आमदार आबू आझमी सारखे लोक करत आहेत. औरंगजेब, टिपू सुलतानसारख्या हिंदूंवर अनन्वित अत्याचार करणाऱ्या क्रूर विकृत शासकाचे व्हिडीओ, स्टेट्स ठेवणे, त्यांच्याविषयीं गोडवे गाणे व तत्सम प्रकारे उदात्तीकरण करून बहुसंख्य हिंदू समाजाच्या भावना दुखावन्याच काम जाणूनबुजून आबू अझमी करत आहे. अशा व्यक्तीला महाराष्ट्राच्या पवित्र अशा विधानसभेत सदस्य म्हणून राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. तरी आमदार आबू आजमी यांचे तात्काळ निलंबन करून, महाराष्ट्रात हिंदू हत्याकांड घडवणाऱ्या औरंगजेब, टिपू सुलतान सारख्यांचे उदात्तीकरण करणे कायद्याच्या दृष्टीने दखलपात्र गुन्हा ठरवा असा कायदा विधिमंडळात पारित व्हावा, ही मागणी भाजपा जावलीच्या वतीने करण्यात आली.
यावेळी मेढा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आबू आझमी यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. आबू आझमी यांच्या प्रतिमेला जोडो मारून निषेध करण्यात आला. भाजपा जावली तालुका अध्यक्ष श्रीहरी गोळे यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल देशपांडे, मेढा शहर अध्यक्ष संजय सपकाळ, तालुका उपाध्यक्ष अंकुश बेलोशे, दत्ता शिंदे, सरचिटणीस नितिन गावडे, मारुती चिकणे, बाजार समिती संचालक हनुमंत शिंगटे, नगरसेवक विकास देशपांडे, प्रवीण गाडवे, दत्तात्रय किर्दत, दत्तात्रय गुजर, मनीष गोळे, शिवाजी गोरे, शिवाजी देशमुख राजेश काकडे, प्रकाश गोळे, सुरेश सणस व विविध हिंदुत्ववादी संघटनाचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मेढा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!