सह्याद्रि कारखान्यात ईएसपी
बॉयलरची टेस्टींग करताना स्फोट
चार कर्मचारी भाजल्याने गंभीररीत्या जखमी
कराड : कराड तालुक्यातील यशवंतनगर येथील सह्याद्रि सहकारी साखर कारखान्यात ईएसपी बॉयलरचा टेस्टींग करताना स्फोट झाल्याची घटना गुरुवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत तीन ते चार कर्मचारी गंभीररित्या भाजल्याची माहिती मिळाली आहे. जखमींना तात्काळ उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. शैलेश भारती (वय 32 रा. उत्तर प्रदेश), अमित कुमार (वय 19 रा. बिहार), धर्मपाल (वय 19 रा. उत्तर प्रदेश ) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.
यशवंतनगर येथे सह्याद्रि सहकारी साखर कारखान्यात ऊसाचे गाळप सुरु आहे. मागील १५ दिवसापूर्वी ईएसपी बॉयलर कारखान्यात बसविण्यात आला आहे. त्याचे आठ दिवसापासून टेस्टींग सुरु आहे. गुरुवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारासही टेस्टींग सुरु असताना तेथे मोठा स्फोट झाला. त्या दुर्घटनेत टेस्टींगचे काम करणारे तीन ते चार कर्मचारी गंभीररित्या
जखमी झाले असून, त्यांना तात्काळ उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!