बिबट्याच्या हल्ल्यात वारेली येथील वृद्ध जखमी



बिबट्याच्या हल्ल्यात

वारेली येथील वृद्ध जखमी


स्वसंरक्षणासाठी मारलेल्या भाल्याच्या घावाने वन्यप्राणी बिबट्याचा मृत्यू


चिपळूण : चिपळूण तालुक्यातील मौजे वारेली येथील श्री. आशिष शरद महाजन यांच्या राहत्या घराच्या बाहेर शनिवारी रात्री अकरा ते बारा वाजण्याच्या दरम्यान पाळीव कुत्री भुंकत असल्याने महाजन यांनी घराच्या बाहेर येऊन पाहिले असता बिबट्या त्यांच्या निदर्शनास आला. यावेळी बिबट्या हा कुत्र्यावर हल्ला करत आहे असे लक्षात येतातच कुत्र्याला वाचविण्यासाठी प्रयत्न करीत असताना बिबट्याने आशिष महाजन यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यातील ते जखमी झाले असून स्वसंरक्षणासाठी त्यांनी बिबट्याच्या मानेवर जोराने मारले व छातीत भाला खुपसल्याने बिबट्याचा मृत्यू झाला. श्री. आशिष महाजन यांना जखमी झाल्याने त्यांना  उपचारासाठी मौजे सावर्डे येथील भ. क. ल. वालावलकर रुग्णालयात दाखल केले असून प्रकृती स्थिर आहे.


याबाबत घटनेची माहिती अशी की, मौजे वारेली (ता. चिपळूण) येथील श्री. आशिष शरद महाजन (वय ५५) यांच्या राहत्या घराच्या बाहेर शनिवारी रात्री अकरा ते बारा वाजण्याच्या सुमारास त्यांची पाळीव कुत्री भुंकत असल्याने श्री. महाजन यांनी घराच्या बाहेर येऊन पाहिले असता बिबट्या असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. बिबट्या हा त्यांच्या कुत्र्याच्या दिशेने हल्ला करण्याच्या उद्देशाने येत असल्याचे त्यांनी पाहिले. ते कुत्र्याला बिबट्यापासून वाचविण्यासाठी प्रयत्न करीत असताना बिबट्याने आशिष महाजन यांच्यावर हल्ला केला. त्यावेळी महाजन व त्यांची पत्नी सौ. सुप्रिया महाजन यांनी त्यांना या बिबट्यापासून संरक्षण करण्यासाठी घरात असलेला टोकदार भाला श्री. आशिष महाजन यांच्याकडे दिला. त्यानंतर बिबट्या त्यांच्या अंगावर आल्यावर त्यांच्यात झटापट झाली असता महाजन यांनी स्वसंरक्षणासाठी बिबट्याच्या मानेवर जोराने मारले व छातीत भाला घुसवला. त्यामध्ये वन्यप्राणी बिबट्याचा मृत्यू झाला.


श्री. आशिष महाजन या झटापटीत जखमी झाल्याने त्यांना प्राथमिक उपचारासाठी केंद्र मौजे वहाळ येथे दाखल केले. वैद्यकिय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रथमोपचार करून अधिक उपचारासाठी मौजे सावर्डे येथील भ. क. ल. वालावलकर रुग्णालयात दाखल करण्यात केले आहे. त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत.

या घटनेची माहिती मिळतच वनविभागाचे अधिकारी या ठिकाणी जावून मृत बिबट्याची तपासणी केली. तेव्हा मृत बिबट्या मादी जातीचा असून वय अंदाजे १.६ ते २ वर्ष असल्याचे समजले. या मृत बिबट्याच्या छातीवर मोठी जखम झाली आहे. तर पाय, मानेवर जखमा असल्याचे दिसून आले आहे. या बिबट्याची मोजमापे घेतली असून नाकाच्या शेंड्यापासून ते शेपटीच्या टोकापर्यंत लांबी १९० से. मीटर आहे. पुढील पायाची उंची ५४ से. मी तर मागील पायाची उंची ६० से.मी इतकी आहे. पंजे तपासले असता पंजे, नखे, मिशा व दात तपासले असता तेही सुस्थितीत असल्याची खात्री झाली आहे. या मृत बिबट्याला ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडे घेऊन आले आहेत. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

Post a Comment

0 Comments