7 कलमी कार्यक्रमांची प्रभावी
अंमलबजावणी करावी :
जिल्हाधिकारी संतोष पाटील
शासनाच्या शंभर दिवस सुधारणा विशेष मोहीम
सातारा : शासनाच्या शंभर दिवस सुधारणांच्या विशेष मोहीम अंतिम टप्प्याच्या मूल्यमापनाच्या कार्यपद्धतीत आता जिल्हा व तालुकास्तरावरील सर्व कार्यालयांचा समावेश करण्यात आला आहे. शंभर दिवस कृती आराखड्यामध्ये सात कलमी कार्यक्रमांतर्गत विविध बाबींचा समावेश आहे, यांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिल्या.
शंभर दिवस कृती आरखडा अंमलबजावणीचा आढावा जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, उपवनसरंक्षक आदिती भारद्वाज, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, उपजिल्हाधिकारी (महसूल) विक्रांत चव्हाण यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते
शंभर दिवस कृती आराखड्यामध्ये पहिल्या टप्प्यात जी कार्यालये होती त्या कार्यालयांनी आपली उर्वरित कामे पूर्ण करावीत, अशा सूचना करुन जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, विशेष मोहिम अंतिम टप्प्यामध्ये जिल्हा व तालुकास्तरावरील सर्व कार्यालयांचा शंभर दिवस कृती आराखड्यात समावेश केला आहे. सर्व कार्यालयांनी सात कलमी कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करून जिल्हा, तालुका व विभाग तसेच राज्यस्तरावर क्रमांक कसे पटकविले जातील या दृष्टीने काम करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी केल्या.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!