शहाजीराजे महाराजांच्या समाधीस्थळाचा डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन करणार जीर्णोद्धार

 


शहाजीराजे महाराजांच्या

समाधीस्थळाचा डॉ. श्रीकांत शिंदे

फाऊंडेशन करणार जीर्णोद्धार  

फाउंडेशनचे सदस्य मंगेश चिवटे यांच्या हस्ते ५ लाखांचा धनादेश शहाजीराजे स्मारक ट्रस्टला सुपूर्द

मुंबई : कर्नाटक राज्यातील दावणगेरे जिल्ह्यातील चेन्नागिरी तालुका येथील होदेगिरी गावातील स्वराज्यसंकल्पक शहाजीराजे भोसले यांच्या दुर्लक्षित स्मारकाच्या संपूर्ण जीर्णोद्धारासाठी डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने पहिल्या टप्प्यात ५ लक्ष रुपयांचा धनादेश श्री. शहाजीराजे स्मारक ट्रस्टला सुपूर्द करण्यात आला.

शहाजीराजे भोसले यांच्या समाधीस्थळाची दुरवस्था झाल्याची बाब ज्येष्ठ इतिहास संशोधक पानिपतकार श्री. विश्वास पाटील यांनी सर्वप्रथम समाजमाध्यमाद्वारे लक्षात आणून दिली होती, याची तातडीने दखल घेऊन आज त्यांच्याच प्रमुख उपस्थितीत हा धनादेश शहाजीराजे स्मारक ट्रस्टला सुपूर्द करण्यात आला. या वेळी श्री शहाजी स्मारक अभिवृद्धी सेवा समितीचे अध्यक्ष श्री. मल्लेश शिंदे यांच्याशी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधून हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सर्व सहकार्य करण्याची तयारी दर्शवली.

या वेळी प्रसिद्ध लेखक आणि कादंबरीकार श्री. विश्वास पाटील, डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनचे सदस्य मंगेश चिवटे, बाजीराव चव्हाण, प्रशांत साळुंखे, अतुल चतुर्वेदी तसेच श्री शहाजी स्मारक अभिवृद्धी सेवा समितीचे अध्यक्ष मल्लेश शिंदे, सचिव रामचंद्र राव, सदस्य मंजुनाथ पवार, शामसुंदर सूर्यवंशी, अन्नोजी राव पवार, सतीश पवार, किरण शिंदे, सुदर्शन पवार, प्रशांत भोसले, गोविंद राजे भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments