पांडवगडावर अत्तराच्या सुगंधाने मधमाशांचा गिर्यारोहकांवर हल्ला

 


पांडवगडावर अत्तराच्या सुगंधाने

मधमाशांचा गिर्यारोहकांवर हल्ला


चार जण गंभीर जखमी, तर दोघे जण बेशुध्दावस्थेत


सातारा : वाई तालुक्यातील पांडवगडावर पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील येथील सहा जण फिरण्यासाठी आले होते. यावेळी अत्तराच्या वासाने अचानक मधमाशा खवळल्या आणि हजारो मधमाशा त्यांच्या अंगावर तुटून पडल्या. यात चार जण गंभीर जखमी झाले, तर दोघे बेशुध्दावस्थेत होते. त्यांना तातडीने वाई येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास पांडवगडावर ही घटना घडली.


घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, इंदापूर तालुक्यातील नृसिंहपूर येथील आल्हाद दंडवते,  निखील क्षीरसागर, गाेपाळ आवटी, अमाेल दंडवते, संताेष झापे, चैतन्य देवळे हे सहा जण वाई तालुक्यातील मांढरदेवजवळ असणार्‍या पांडवगड येथे गिर्यारोहणासाठी आले हाेते. साेमवारी पहाटेच ते गडावर पाेहचले. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास फिरत असताना मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला केला. माेठ्या प्रमाणावर मधमाशा खवळल्या असल्याने त्यांनी गिर्याराेहणकांवर हल्ला केला. यात चार जण गंभीर जखमी झाले, तर दोघे बेशुध्दावस्थेत होते. त्यांना तातडीने वाईच्या दवाखान्यात आणण्यात आले.


या घटनेची माहिती मिळताच शिव सह्याद्री बचाव पथकचे राजेंद्र खरात, आशुतोष शिंदे, रोहित मुंडे, सौरभ जाधव, दिशा-शिवसह्याद्री अकादमीचे विद्यार्थी, सरकारी हॉस्पिटलमधील वैद्यकीय अधिकारी गुंडेवाडी व परिसरातील तरुण खूप मोठ्या संख्येने मदतीला धावून आले. तसेच वाई पोलिसांना व वाई पंचायत समितीमधील वाई तालुका वैद्यकीय कक्षाला समजताच त्यांनी ५ रुग्णवाहिकांसह धाव घेतली.

वाई पोलिस ठाण्याचे हवालदार श्रीनिवास बिराजदार, डिबीचे विभागाचे नितीन कदम, कवठे प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. दिलिप भोजने, नरेंद्र सणस, सी.बी. जाधव, अजित चव्हाण, गीता वाठारकर या वैद्यकीय टीमने तातडीने ५ किलोमीटर डोंगर चढून घटनास्थळी पोहोचले. जखमींचा शोध घेऊन त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू करून तब्बल पाच किलोमीटर पाऊलवाटेने खाली आणण्यात आले. पुढील उपचारासाठी त्यांना रुग्णवाहिकेतून वाईच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.


जाहिरातीच्या युगात टीव्ही व इतर माध्यमातून वेगवेगळ्या परफ्युमच्या जाहिराती पाहून अनेक लोक प्रेरित होतात त्या जाहिरातींमध्ये परफ्युम वापरल्यानंतर अनेक सुंदर ललना आपल्याकडे आकर्षित होतात, असं चित्र दाखवले जाते. त्यामुळे असे परफ्युम वापरून ट्रेकला गेल्यास सुंदर ललना आकर्षित होतात की नाही माहिती नाही, पण मधमाशा त्या वासाने विचलित होतात व परफ्युम मारणाऱ्या माणसांवर, व्यक्तींवर जीवघेणं हल्ला करतात. त्यामुळे जंगलात, निसर्गाच्या ठिकाणी भ्रमण अथवा गिर्यारोहण करत असताना कोणत्याही प्रकारचा परफ्युम, अत्तर व कोणत्याही प्रकारचे सुवासिक पदार्थांचा वापर न करता भ्रमण करावे, असे आवाहन पर्यावरण रक्षक, समाजसेवक प्रशांत डोंगरे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments