"उन्नती"चा मार्चअखेरपर्यंत पुणे जिल्ह्यात शाखा विस्तार करणार : संस्थापक श्री. हनुमंत रांजणे

 


"उन्नती"चा मार्चअखेरपर्यंत

पुणे जिल्ह्यात शाखा विस्तार :

संस्थापक श्री. हनुमंत रांजणे

"उन्नत्ती"च्या सुवर्ण तारण कर्जाच्या नवीन शाखांचा ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात शुभारंभ

मुंबई (संतोष शिराळे) : उन्नत्ती फिनसर्व प्रा. लि. कंपनीमध्ये ५५०हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. त्यात सातारा जिल्ह्यातील २२५ हून अधिक तरुण-तरुणी कंपनीत कामकाज पहात आहेत. उन्नती कंपनीचा मार्चअखेरपर्यंत पुणे जिल्ह्यात शाखा विस्तार करण्यात येणार आहे, अशी माहिती जावळी तालुक्यातील वहागावचे सुपुत्र उद्योजक, उन्नत्ती व उत्कर्ष परिवाराचे सर्वेसर्वा श्री. हनुमंत बळवंत रांजणे यांनी "टाइम्स ऑफ यंग व्हॉईस"शी बोलताना सांगितले.


उन्नत्ती फिनसर्व प्रा. लि. या कंपनीच्या सुवर्ण तारण कर्जाच्या नवीन पाच शाखाचा शुभारंभ नुकताच ठाणे जिल्ह्यातील कल्याण, पालघर जिल्ह्यातील वसई व नालासोपारा व रायगड जिल्ह्यातील नेरळ व कळंबोली येथे या शाखा सुरू करण्यात आला. त्यावेळी संस्थापक श्री हनुमंत रांजणे बोलत होते.

हनुमंत रांजणे म्हणाले, "उन्नतीच्या महिला बचत गट कर्ज, व्यवसाय कर्ज, प्रगती व मालमत्ता तारण कर्जाच्या महाराष्ट्र व गुजरात या २ राज्यात मिळून ४५ शाखा कार्यान्वित आहेत. त्यामुळे आता शाखांची एकूण संख्या ५२ झाली आहे. कंपनीचे मुख्यालय सानपाडा (नवी मुंबई) येथे असून सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात करहर येथे एक शाखा कार्यान्वित आहे. या शाखेच्या माध्यमातून जावळीसारख्या दुर्गम भागातील महिलांना बचत गटाच्या माध्यमातून आपली प्रगती साधता येत आहे. याचा मला आनंद आहे. मी आपल्या लोकांचे आर्थिक स्थैर्य निर्माण करण्यासाठी खारीचा वाटा उचलत आहे, याचे मला समाधान वाटते."


ते पुढे म्हणाले, "उन्नती फिनसर्व प्रा. लिमिटेड कंपनीमध्ये मुलांना रोजगार व चांगली नोकरी मिळवून देण्याचा कायम प्रयत्न राहिला आहे. सातारा जिल्ह्यातील विशेषत: जावळी तालुक्यातील उच्च शिक्षण घेतलेल्या तरुण मुलांना रोजगार मिळवून देण्यासाठी आपण कायम बांधील आहोत."


ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यात शाखांचा विस्तार : संस्थापक हनुमंत रांजणे

उन्नत्ती फिनसर्व प्रा. लि. या कंपनीच्या सुवर्ण तारण कर्जाच्या नवीन पाच शाखाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. ठाणे जिल्ह्यातील कल्याण, पालघर जिल्ह्यातील वसई व नालासोपारा व रायगड जिल्ह्यातील नेरळ व कळंबोली येथे या शाखा सुरू करण्यात आल्या आहेत. उन्नतीच्या सुवर्ण तारण कर्जाच्या दोन शाखा घणसोली व उलवे येथे यापूर्वीच कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. उन्नतीच्या सुवर्ण तारण कर्ज विभागाच्या शाखा आता सात झाल्या आहेत, असे हनुमंत रांजणे यांनी सांगितले.


यावेळी उन्नत्ती फिनसर्व प्रा. लि.च्या संचालिका सोनाली रांजणे, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित रांजणे, गोल्ड लोन विभागप्रमुख हरी नायर, मुख्य दक्षता अधिकारी बलशीराम शिंदे, आयटी हेड अंकुर पवार व कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments