टंचाईपूर्वी जल जीवन मिशनची
कामे तातडीने पूर्ण करा :
पालकमंत्री शंभूराज देसाई
सातारा : पाणी टंचाईस एप्रिल महिन्यापासून सुरुवात होते. ग्रामीण भागातील नागरिकांना टंचाई भासू नये, यासाठी जल जीवन मिशन अंतर्गतची कामे तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभागृहात पालकमंत्री श्री. देसाई यांनी जल जीवन मिशन अंतर्गतच्या कामांचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी यांच्यासह जिल्हा परिषदेमधील संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
ग्रामीण भागातील नागरिक पाण्यापासून वंचित राहू नयेत यासाठी मिशन मोडवर काम करावे, असे निर्देश देवून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, विद्युत जोडणीसाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल. तसेच निधी कमी पडत असल्यास 15 व्या वित्त आयोगातून निधी उपलब्ध करुन घ्यावा. नळ जोडण्यांचे काम प्राधान्याने हाती घ्यावा. जिल्हा परिषदेमधील संबंधित अधिकाऱ्यांनी गावभेटी देवून वेळोवेळी कामांच्या प्रगतीचा आढावा घ्यावा, अशा सूचना पालकमंत्री श्री. देसाई यांनी केल्या.
या बैठकीनंतर लोकनेते बाळासाहेब देसाई भवन पंचायत समिती पाटणच्या विस्तारीत इमारतीचा आढवा पालकमंत्री श्री. देसाई यांनी घेतला. या पंचायत समितीचा आणखी एक मजला वाढवायचा आहे. यासाठी साडे पाच कोटींचा निधी लागणार असून या निधीसाठी पाठपुरावा केला जाईल,असेही पालकमंत्री श्री. देसाई यांनी बैठकीत सांगितले.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!