भाजपाचा दिल्ली विधानसभा निवडणुकीत विजय

भाजपाचा दिल्ली विधानसभा

निवडणुकीत विजय 

साताऱ्यात पदाधिकाऱ्यांनी पेढे वाटून केला आनंदोत्सव साजरा 

सातारा : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या विजयानंतर साताऱ्यातील पदाधिकाऱ्यांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला. सातारा शहरातील मुख्य असलेल्या मोती चौकात फटाके फोडून, घोषणा देऊन आनंद व्यक्त केला. सातारकर नागरिकांना पेढे देऊन त्यांचे तोंड गोड केले.

भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, दिल्लीमधील भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी यांचे नियोजन, माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिल्लीमध्ये घरोघरी केलेला प्रचार, माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिल्लीमधील पदाधिकाऱ्यांना केलेल्या सूचना, तेथील नागरिकांबरोबर साधलेला संपर्क, दिल्ली भाजपा कार्यकर्त्यांनी जीव तोडून केलेले काम आणि मतदारांनी त्यांना दिलेली योग्य साथीमुळेच हा विजय शक्य झाल्याचे भाजपा सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुवर्णाताई पाटील यांनी सांगितले.


यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुवर्णाताई पाटील, भाजपा सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, सरचिटणीस नितीन कदम, चंदन घोडके, विक्रांत भोसले, वैशाली टंगसाळे, नगरसेवक आणि जिल्हा उपाध्यक्ष धनंजय जांभळे, विजय काटवटे, जिल्हा उपाध्यक्ष रवी आपटे, सातारा शहर उपाध्यक्ष विजय नायक, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष विक्रम बोराटे, भटके मुक्त आघाडी प्रदेश उपाध्यक्ष सदाशिव नाईक, भटके मुक्त आघाडी सातारा जिल्हा उपाध्यक्ष भारत पवार, विस्तारक अविनाश खर्शीकर, महिला मोर्चा सातारा शहराध्यक्ष रीना भणगे, ज्येष्ठ कार्यकर्ता आघाडी सरकार शहराध्यक्ष रोहिणी क्षीरसागर, बेटी बचाव बेटी पढाव आघाडी जिल्हाध्यक्ष अश्विनी हुबळीकर, ओबीसी मोर्चा महिला जिल्हाध्यक्ष वनिता पवार, जैन महिला आघाडी जिल्हाध्यक्ष नीता रणदिवे, शहराध्यक्ष सुचारीचा कंडारकर, सातारा शहर चिटणीस राजेश माजगावकर, चेतन घाडगे व पदाधिकारी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments