ज्येष्ठ पत्रकार राजा माने
यांच्या वाढदिवसानिमित्त
विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
मेढा : डिजीटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांचा वाढदिवस नुकताच जावळी तालुक्यातील दुर्गम असलेल्या गाळदेव येथे झाला. जावली तालुका डिजीटल मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीने गाळदेव येथील पांडवकालीन गाळेश्वर मंदिरात राजा माने यांच्या वाढदिवसाचे आयोजन केले होते.
वाढदिवसाबद्दल गाळदेव प्राथमिक शाळेमध्ये मुलांना शिवाचार्य नीलकंठ स्वामी महाराज यांच्या हस्ते स्कूल बॅग, तसेच फळेवाटप करण्यात आली. दुर्गम शाळेमध्ये असा कार्यक्रम पहिलाच झाल्यामुळे मुलांच्या चेहऱ्यावर आनंद खुलला होता. पत्रकारांनी सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडली पाहिजे. गावातील शाळेतील मुलांवर प्रेमाने हात फिरवला, त्यांना शालेय साहित्य प्रोत्साहनपर दिल्याबद्दल श्री गणेश मित्र मंडळ व ग्रामस्थ गाळदेव आपले ऋणी आहे, असे सांगत मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम यांनी आभार मानले.
कार्यक्रमास डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष संतोष शिराळे, तालुकाध्यक्ष सुनील धनावडे, कार्याध्यक्ष देवेंद्र साळुंखे, सचिव शेखर जाधव, उपाध्यक्ष राहुल ननावरे, संघटक बजरंग चौधरी, संपर्कप्रमुख जितीन वेंदे, हणमंतराव धनावडे, संजय धनावडे, राजू शेलार, आनंदराव सपकाळ, हणमंत शिंगटे, शंकर जंगम, संदीप जंगम, संपत जंगम, मनोहर जंगम ग्रामस्थ वागदरे, म्हाते बु.,गोंदेमाळ, गाळदेव, महिला मंडळ, शिक्षक, अंगणवाडी सेविका व विद्यार्थी उपस्थित होते. शंकर जंगम यांनी स्वागत केले. भागोजी पाटील यांनी आभार मानले.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!