छत्रपती शिवाजी महाराज हे
केवळ राष्ट्रपुरुषच नव्हे तर
युगपुरुषही होते
प्राचार्य डॉ. विजयराव नलावडे; छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये शिवजयंती महोत्सव
सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जातीधर्मातील लोकाना एकत्र करून त्यांच्याच सहकार्याने प्रतिकूल परिस्थिती असतानाही हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. याच्याच जोरावर त्यांनी या स्वराज्याचा विस्तार करून मराठ्यांच्या राज्याचा नावलौकिक केला. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ राष्ट्रपुरुषच नव्हे तर युगपुरुषही होते, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. विजयराव नलावडे यांनी केले.
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ, सातारा घटक महाविद्यालय छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा येथे शिवजयंती महोत्सवानिमित्ताने अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य डॉ. विजयराव नलावडे यांचे "छत्रपती शिवाजी महाराजांना समजून घेताना" या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित केले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.(डॉ.) शिवाजीराव पाटील हे होते. त्यांनी अध्यक्षीय मनोगतात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजकीय, प्रशासकीय, आर्थिक व धार्मिक कार्याविषयी माहिती दिली. ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी राजकीय क्रांती बरोबरच सामाजिक क्रांतीही केली होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास विभाग प्रमुख प्रो.(डॉ.) धनाजी मासाळ यांनी केले. तर प्रमुख पाहुण्यांची ओळख कार्यक्रमाचे समन्वयक प्रा.डॉ. विकास येलमार यांनी केली. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. डॉ. चिंदे एम.डी. यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. मनोहर निकम यांनी केले.
यावेळी या कार्यक्रमास अग्रणी महाविद्यालय समन्वयक प्रा.डॉ. राज चव्हाण तसेच प्रा.(डॉ.) आर.आर.साळुंखे व प्रा.(डॉ.) एस.एस.मेनकुदळे तसेच इतिहास विभागातील प्रा.डॉ. दत्तात्रय कोरडे प्रा.डॉ. कबीरदास वाघमारे, प्रा.शरद ठोकळे, प्रा.डॉ. सीमा कदम, प्रा.डॉ. राजू लोखंडे व प्रा.निलेश जमदाडे उपस्थित होते.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!