पाटेश्वरनगर येथे पिसाळलेल्या
कुत्र्याने चावा घेतल्याने
महिला गंभीर जखमी
सातारा : पिसाळलेल्या कुत्र्याने अचानक घरात घुसून पाटेश्वरनगर (बोरगाव) ता. सातारा येथील सौ. नंदा जयसिंग बैलकर यांना चावा घेतल्याने त्या जखमी झाल्या आहेत. ही घटना शुक्रवारी दुपारी दोन वाजता घडली. नंदा बैलकर यांना तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. राहत्या घरीच कुत्र्याने हल्ला करून जखमी केल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर गावामधील पृथ्वीराज जाधव, ज्ञानेश्वर अडागळे, रवी रावत (सर्व सध्या रा. पाटेश्वरनगर) यांना रात्री आठ वाजता कुत्र्याने चावा घेतल्याने जखमी झाले आहेत. रात्री पिसाळलेल्या कुत्र्याने पाटेश्वरनगर येथील नागरिकांवर हल्ला केल्याने गावात कुत्र्याची दहशत निर्माण झाली आहे. पिसाळलेले कुत्रे मोकाट असल्याने गावातील लोक भयभीत होऊन दरवाजे बंद करून घरात बसले आहेत. जखमींवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. कुत्र्याने चावा घेतल्याने जखमा मोठ्या प्रमाणात झाल्या आहेत.
पाटेश्वरनगर येथे पिसाळलेल्या कुत्र्याने नागरिकांवर हल्ला केल्याने त्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!