जय शिवाजी, जय भारत
पदयात्रेचे दिमाखदार आयोजन
करा : जिल्हाधिकारी पाटील
सातारा : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 19 फेब्रुवारी रोजी असून, ही जयंती देशासह महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात साजरी करण्यात येणार आहे. महाराजांच्या जयंतीनिमित्त जय शिवाजी, जय भारत पदयात्रा सातारा शहरातून काढावयाची आहे, याचे दिमाखदार नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, प्रांताधिकारी आशिष बारकुल, तहसीलदार नागेश गायकवाड, जिल्हा उपनिबंधक संयजकुमार सुद्रिक, नगर पालिका प्रशासन अधिकारी अभिजीत बापट, जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जय शिवाजी, जय भारत पदयात्रा ही राजवाडा, राजपथ मार्गे, शिवतिर्थ, छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय अशी राहील, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, पदयात्रेमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सहभाग घ्यावा. जयंती दिवशी संपूर्ण शहर शिवकालीन झाले पाहिजे. यासाठी शिवकालीन साहसी खेळांचे चौकाचौकात आयोजन करावे. पदयात्रेच्या मार्गावर दोन्ही बाजूला रांगोळ्या काढाव्यात.
आरोग्य विभागाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिवशी आरोग्य शिबीराच्या आयोजनाबरोबर रक्तदान शिबीर व पदयात्रा मार्गावर जीबीएस आजारा विषयी जनजागृती करावी. योग प्रशिक्षणाचेही आयोजन करावे. या पदयात्रेमध्ये सातारा जिल्ह्यातील कलावंत, क्रीडा संघटक यांच्यासह शिवप्रेमींचाही सहभाग असला पाहिजे. शिवतिर्थावर पोलीस बँन्ड पथकाने मानवंदना द्यावी. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीनिमित्त जय शिवाजी जय भारत पदयात्रा भव्य दिव्य अशी झाली पाहिजे यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे, असेही निर्देश जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी दिले.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!