सातारा : उद्योजकता विकास शिबिरात मार्गदर्शन करताना डॉ. भावेश भाटीया.मंचावर उपस्थित पद्मश्री लक्ष्मण माने, नीता भाटीया, डॉ. शाली जोसेफ, भाईशैलेंद्र माने, जीवन बोराटे व मान्यवर.
कोशिश करनेवालो की कभी हार
नही होती : डॉ. भावेश भाटीया
तीन दिवसीय उद्योजकता विकास शिबिराचा शारदाश्रमात समारोप
शारदाश्रम, सातारा : वाट पाहणाऱ्याच्या हाती तेवढेच येत जेवढ प्रयत्न करणारे सोडून जातात, प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचा कधीही पराभव होत नाही, असे मत सनराईज कॅण्डलचे प्रमुख डॉ. भावेश भाटीया यांनी शारदाश्रम येथे उद्योजकता विकास शिबिराच्या समारोप कार्यक्रमात व्यक्त केले.
भटक्या विमुक्त जमाती संघटना महाराष्ट्र, सेंटर फॉर युथ डेव्हलपमेंट पुणे, युथ एड फौंडेशन व यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ सोशल वर्क, जकातवाडी, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय उद्योजकता विकास शिबिराचे आयोजन शारदाश्रम जकातवाडी सातारा येथे करण्यात आले होते. या शिबिरामध्ये सहभागी शिबिरार्थीना स्वतःचा विकास, संभाषण कौशल्य आणि गंभीर विचार करून व्यवसायाची संकल्पना विकसित करत व्यवसायासाठी भांडवल जमा करणे, त्या भांडवलाचा योग्य ठिकाणी वापर करणे, उत्पादन क्षमता वाढविणे तसेच तयार केलेल्या उत्पादनाला योग्य बाजारपेठ मिळवून देणे ई. विषयांवर तज्ञांचे मार्गदर्शन मिळाले. तसेच शिबिरातील सहभागींकडून व्यवसाय योजना बनवत, त्या योजनाचे प्रत्यक्ष सादरीकरण करून घेत या व्यवसायांना विविध शासकीय, निमशासकीय तसेच कार्पोरेट सोशल रीस्पोन्सीब्लिटी फंड ई. माध्यमातून भांडवल उभे करण्यास सहकार्य करण्यात आले.
शिबिराच्या समारोप सत्रास प्रमुख पाहुणे म्हणून सनराईज कॅण्डलचे प्रमुख डॉ.भावेश भाटीया उपस्थित होते.
डॉ. भाटीया म्हणाले, व्यवसायिकांनी आपला व्यवसाय करत असताना येणाऱ्या संकटाचे रुपांतर संधीत करावे तसेच व्यवसाय करत असताना केवळ मी आणि माझं इतकच न पाहता व्यापक दृष्टीकोनातून माझ्या व्यवसायाचा फायदा समाजातील शेवटच्या घटका पर्यंत कसा होईल याचा कायम विचार लक्षात घेऊन आपला व्यवसाय पुढे चालवला पाहिजे.
डॉ. भाटीया यांनी स्वतः पूर्णपणे दिव्यांग असताना सनराईज कॅण्डल हा व्यवसाय महाबळेश्वर येथे सुरु केला. आज ते स्वतः हजारो दिव्यांग व्यक्तींना रोजगार देत यशस्वी उद्योजक ठरले आहेत. या कार्याचा सन्मान करीत भारत सरकारने 2012 साली अंध स्वयंरोजगार पुरस्कार, रिलायंस फौंडेशन पुरस्कार अशा विवध पुरस्कारानी गौरव करण्यात आला आहे.
प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.भावेश भाटीया, नीता भाटीया, अध्यक्षस्थानी पद्मश्री लक्ष्मण माने, भाईशैलेंद्र माने, डॉ.शाली जोसेफ, जीवन बोराटे, संकेत माने, प्रवीण जाधव, रसिका पाटील,तेजस वालेकर, शिवाजी परमार ई. मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक जीवन बोराटे यांनी केले. समारोप डॉ. शाली जोसेफ यांनी केला.
भावेश दृष्टी नसलेले द्रष्टे – पद्मश्री लक्ष्मण माने
भावेश हे पूर्णपणे दृष्टिहीन असूनही त्यांनी आपल्या कल्पक बुद्धिमत्तेने व्यवसाय उभा केला. खचून न जाता हजारो दिव्यांग बांधवाना रोजगार दिला. त्यांच्या तुलनेत आपण थोडी संकटे आली तरी खचून जातो आणि माघार घेतो, परंतु आपण सर्वांनी भावेश यांचा आदर्श घेत पुढ गेल पाहिजे आणि सतत कार्यरत राहील पाहिजे, असे प्रतिपादन पद्मश्री लक्ष्मण माने यांनी केले.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!