साताऱ्यात २६ डिसेंबरपासून रचना २०२४ वास्तुप्रदर्शन

 


साताऱ्यात २६ डिसेंबरपासून रचना २०२४ वास्तुप्रदर्शन

बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सातारा सेंटरतर्फे आयोजन

सातारा : शहर व जिल्हाच नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र ज्याची आतुरतेने वाट पाहत असतो, असे बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, सातारा सेंटरतर्फे आयोजित २०२४” हे बांधकाम क्षेत्राशी निगडीत भव्यदिव्य प्रदर्शन जिल्हा परिषद ग्राऊंन्ड, सातारा येथे दिनांक २६, २७, २८, २९ डिसेंबर, २०२४ यावेळी (सकाळी १०.०० ते रात्री ९.०० वाजेपर्यंत) आयोजित केले आहे. यासाठी प्रवेश विनामुल्य असेल, अशी माहिती बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, सातारा सेंटरचे अध्यक्ष अध्यक्ष सुधीर ठोके, सचिव हर्षद वालावलकर, सुधीर घारगे, अनिल दातीर, सयाजी भोसले यांनी दिली.

“रचना २०२४” चे मुख्य प्रायोजकत्व हे 'Classic Group व Venture by Sumit Bagade' तसेच ‘Scon Infra Prestress LLP' यांनी स्विकारलेले आहे. तसेच या भव्यदिव्य अशा प्रदर्शनाचे सहप्रायोजक हे 'कंग्राळकर असोसिएटस्', 'स्टेट बँक ऑफ इंडिया', 'कालिका स्टिल', 'परफेक्ट होस्टेज प्रा.लि.' यांनी स्विकारलेले आहे.

आपल्या स्वप्नातील घर शोधणाऱ्या तसेच रिअलईस्टेट क्षेत्रात गुंतवणूक करून आपल्या पैशाचा योग्य मोबदला घेऊ इच्छिनाऱ्यांसाठी हे प्रदर्शन म्हणजे एक सुवर्ण संधीच ठरते. बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सातारा शाखा स्थापनेचे हे ३४वे वर्ष साजरे करत आहे. येणारा काळ सातारा शहर व लगतच्या भागांमध्ये रिअलईस्टेटसाठी बांधकाम व्यवसायासाठी सुवर्णकाळ असेल असे जाणकारांचे मत आहे. सातारा व आजूबाजूच्या भागांमध्ये चालू असेलेले व नियोजित असलेले महत्वकांक्षी शासकिय प्रकल्प यामुळे सातारा शहराची लोकसंख्या देखील झपाट्याने वाढत आहे. येणाऱ्या उज्वल भविष्यकाळासाठी गुंतवणूकीकरीता सातारा शहर व परिसर हा भाग गुंतवणूकदारांना पर्वणीच ठरणार आहे.

"रचना २०२४” हे प्रदर्शन म्हणजे केवळ इमारतीची खरेदी-विक्री करण्याचे केंद्र नसून आपल्या घरासाठी लागणारे इंटेरिअर डिझाईन मटेरिअल, मार्केटमध्ये येणारे नव– नवीन तंत्रज्ञान, प्लंबिंग, किचन, गार्डन्स याकरीता लागणाऱ्या अनेक आकर्षक संकल्पना या सर्वांची एकाच ठिकाणी मिळण्याची केलेली ही परिपूर्ण व्यवस्थाच आहे.

नवीन सरकारी धोरणांनुसार बँकेकडे जमा होणारे भरपूर भांडवल हे कमीतकमी व्याजदराने खरेदीदारांना पुरविले जाणार आहे. त्याचप्रमाणे आत्तापर्यंत जास्त वाटणारे व्याजदरही हळूहळू कमी होणार आहेत. “रचना २०२४” या वास्तू प्रदर्शनात अनेक बांधकाम व्यावसायिक अनेक आकर्षक योजनांसह सहभाग घेणार आहेत. त्यामुळे घर घ्यावयाची हिच योग्य वेळ आहे.

"रचना २०२४” या प्रदर्शनामध्ये सुमारे १०० स्टॉलस् उभारले जाणार असून, बिल्डर्स प्रोजेक्टस्, किचन इक्विपमेंन्टस्, इलेक्ट्रिकल ॲसेसरीज्, इनोव्हेटीव्ह बिल्डींग मटेरिअलस्, स्विमिंग पुलस्, गार्डन, फिटनेस इक्विपमेन्टस् अशा विविध पर्यायांनी हे प्रदर्शन परिपूर्ण असेल.

"रचना २०२४” हे प्रदर्शन अतिशय भव्य आणि हायटेक होण्यासाठी सातारा सेंटरचे सर्वच सभासद अतिशय मेहनत घेत आहेत. सातारा जिल्हा परिषद ग्राऊंड येथे हे प्रदर्शन आयोजित केले जाणार आहे. सातारा शहर तालुका व जिल्हा तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून बांधकाम क्षेत्राशी निगडीत सर्व क्षेत्रांतून ४ दिवसात ३ लाखांपेक्षा जास्त लोकं याठिकाणी येऊन सदर प्रदर्शनास भेट देत असतात व यापुढेही देतील. असा आयोजक समितीचा अंदाज असून, करोडो रूपयांची उलाढाल या प्रदर्शनातून होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

ना नफा ना तोटा हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून सातारा सेंटर तर्फे हे प्रदर्शन ओयाजित केले जात असते. सर्व सभासद प्रसंगी स्वतःची कामे बाजुला ठेवून या प्रदर्शनासाठी प्रचंड मेहनत घेऊन या व्यवसायास ऊर्जीतावस्था येण्याकरीता व खरेदीदारांना आपल्या पैशांचा पुरेपुर मोबदला व समाधान मिळावे यासाठी कार्यरत असतात.

“रचना २०२४” मध्ये स्टॉल्स बुकिंगसाठी संपर्क श्री. निलेश पाटील मोबाईल नंबर ८६००४३३९०९ व श्री. मंगेश लावंड मोबईल नंबर ९८२३८८७७७६ यांचेशी संपर्क करावा असे आवाहन बिल्डर्स असोसिएशन सातारा सेंटर तर्फे करणेत आले आहे.

Post a Comment

0 Comments