शिवप्रताप दिन उत्साहात साजरा
करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची सूचना
सातारा : किल्ले प्रतापगड येथे रविवार, दि. 8 डिसेंबर रोजी शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा करावयाचा आहे. याचे सर्व विभागांनी सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालय शिवप्रताप दिन उत्साहात साजरा करण्याबाबत आढावा घेण्यात आला. आढावा बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे-पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
प्रतापगडावर येणाऱ्या पर्यटकांसाठी किल्ले प्रतापगडाच्या संवर्धन व सुशोभीकरणासाठीच्या आराखड्याचे थ्रीडी मॉडेल तयार करावे. त्याचबरोबर किल्ल्याची माहितीही देण्यात यावी. तसेच किल्ले प्रतापगडाच्या संवर्धनाचे काम सुरू आहे. या कामांच्या माध्यमातून प्रतापगड परिसरात देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती पर्यटकांना देण्यात यावी. किल्ले प्रतापगडावर गडावर विद्युत रोषाणई करावी, अशा सूचना करून जिल्हाधिकारी श्री. डुडी म्हणाले, किल्ले प्रतापगडाची संपूर्ण स्वच्छता करावी. ऐतिहासिक मर्दानी खेळांचे, पोवाड्यांचे आयोजन करावे. त्याचबरोबर बाहेरुन येणाऱ्या पर्यटकांसाठी एस. टी. महामंडळाने बसेसची सोय करावी. त्याच बरोबर येणाऱ्या पर्यटकांसाठी अल्पोपहाराचीही व्यवस्था करावी. शिवप्रताप दिनाचे नियोजन करत असताना विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी समन्वय साधून काम करावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!