नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे
रविवारी साताऱ्यात जंगी स्वागत..!
सातारा : सातारा- जावली विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि महाराष्ट्र सरकारमधील कॅबिनेटमंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे रविवार, दि. 22 रोजी साताऱ्यात आगमन होणार आहे. यानिमित्ताने त्यांचे भव्य जंगी स्वागत करण्यात येणार आहे.
सातारा- पुणे महामार्गावर निरा नदी पुलाजवळ ना. शिवेंद्रसिंहराजे यांचे रविवारी सकाळी 10 वाजता आगमन होणार असून, तेथून सताऱ्याच्या दिशेने भव्य रॅली निघणार आहे. महामार्गावर निरा नदी पूल ते शिरवळ, खंडाळा, भुईंज, पाचवड मार्गे कुडाळ, करहर ते मेढा, मेढ्यातून मोळाचा ओढा ते करंजे ते शिवतीर्थ पोवई नाका येथे दुपारी 4 वाजता शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात येणार आहे. याठिकाणी सर्व सातारकरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पोवई नाक्यावरून वाय. सी. कॉलेज मार्गे गोडोली, विलासपूर मार्गे अजिंक्यतारा कारखाना अशी रॅली जाणार आहे. त्याठिकाणी स्व. भाऊसाहेब महाराज यांच्या स्मृतिस्थळावर अभिवादन करण्यात येणार आहे. शेंद्रे येथून बोगदा मार्गे समर्थ मंदिर, राजवाडा ते सुरुची बंगला अशी रॅली होणार आहे. या रॅलीत निरा पूल येथे सर्व कार्यकर्त्यांनी आपली चारचाकी वाहने घेऊन मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सर्व पदाधिकारी, सातारा- जावलीतील ना. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले मित्रसमूहाच्या वतीने करण्यात आले आहे.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!