ना. शिवेंद्रसिंहराजे यांना सार्वजनिक बांधकाममंत्री, तर मकरंद पाटील यांना मदत व पुनर्वसनमंत्रीपद


ना. शिवेंद्रसिंहराजे यांना

सार्वजनिक बांधकाममंत्री,

तर मकरंद पाटील यांना

मदत व पुनर्वसनमंत्रीपद

साताऱ्यात जल्लोष : शंभूराज देसाई यांना पर्यटन, खनिकर्म व सैनिक कल्याणमंत्री, तर जयकुमार गोरे यांना ग्रामीण विकास व पंचायत राज

सातारा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने पाच फेब्रुवारीला शपथ घेतली. त्यावेळी मंत्रिमंडळ विस्तार झाला, पण खातेवाटप झालं नव्हतं. नागपूरचे हिवाळी अधिवेशन खाते वाटपाशिवायच झाले. मात्र, आज अखेरच्या दिवशी खाते वाटप जाहीर करण्यात आले आहे.

सातारा जिल्ह्यात चार कॅबिनेट मंत्रीपद जाहीर झाली होती. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील चौघांना कोणते मंत्रिपद मिळेल याकडे सातारकरांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र, आजच्या खाते वाटपामुळे ही प्रतीक्षा संपली असून सातारा जिल्ह्यातील मंत्रिमंडळात समावेश झालेल्या मंत्र्यांना खातेवाटप झाल्याने समर्थकांनी जल्लोष केला आहे. यात ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना सार्वजनिक बांधकाममंत्री, ना. शंभूराज देसाई यांना पर्यटन, खनिकर्म व सैनिक कल्याणमंत्री, ना. जयकुमार गोरे यांना ग्रामीण विकास व पंचायत राज तर ना. मकरंद पाटील यांना मदत व पुनर्वसनमंत्री पद मिळाले आहे. त्यामुळे समर्थकांमध्ये मोठा जल्लोष पाहायला मिळत आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचे खाते वाटप जाहीर झाले असून संपूर्ण यादी खालीलप्रमाणे: 




कॅबिनेट मंत्री

1.चंद्रशेखर बावनकुळे - महसूल

2.राधाकृष्ण विखे पाटील - जलसंधारण ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास)

3.हसन मुश्रीफ - वैद्यकीय शिक्षण

4.चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री

5.गिरीश महाजन - जलसंधारण (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन

6.गुलाबराव पाटील - पाणीपुरवठा

7.गणेश नाईक - वन

8.दादाजी भुसे - शालेय शिक्षण

9.संजय राठोड - माती व पाणी परीक्षण

10. धनंजय मुंडे - अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण

11.मंगलप्रभात लोढा - कौशल्य


12.उदय सामंत - उद्योग व मराठी भाषा

13.जयकुमार रावल - विपणन, प्रोटोकॉल

14. पंकजा मुंडे - पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन

15.अतुल सावे - ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय, ऊर्जा नुतनीकर

16.अशोक उईके - आदिवासी विकास मंत्रालय

17.शंभूराज देसाई - पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय

18.आशिष शेलार - माहिती व तंत्रज्ञान 

19.दत्तात्रय भरणे - क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय

20.अदिती तटकरे - महिला व बालविकास 

21.शिवेंद्रराजे भोसले - सार्वजनिक बांधकाम

22.माणिकराव कोकाटे - कृषी 

23. जयकुमार गोरे - ग्रामविकास, पंचायत राज

24.नरहरी झिरवाळ - अन्न व औषध प्रशासन

25.संजय सावकारे - कापड

26.संजय शिरसाट - सामाजिक न्याय 

27.प्रताप सरनाईक - वाहतूक 

28.भरत गोगावले - रोजगार हमी,फलोत्पादन

29.मकरंद पाटील - मदत व पुनर्वसन

30.नितेश राणे - मत्स्य आणि बंदरे 

31.आकाश फुंडकर - कामगार 

32.बाबासाहेब पाटील - सहकार 

33.प्रकाश आबिटकर - सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण 



राज्यमंत्री (State Ministers )

34. माधुरी मिसाळ - सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण 

35. आशिष जयस्वाल - अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय 

36. मेघना बोर्डीकर - सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा 

37. इंद्रनील नाईक - उच्च आणि तंत्र शिक्षण , आदिवासी विकास आणि पर्यटन 

38. योगेश कदम - गृहराज्य शहर

39. पंकज भोयर - गृहनिर्माण,विकास, रोजगार, उद्योग व संशोधन

Post a Comment

0 Comments