श्रीमती विमल पवार यांचे वृद्धापकाळाने निधन



श्रीमती विमल पवार यांचे

वृद्धापकाळाने निधन 


सातारा : वहागाव (ता. जावळी) येथील प्रगतशील शेतकरी श्री. दत्तात्रेय पवार व श्री. ज्ञानदेव पवार यांच्या आई श्रीमती विमल किसन पवार यांचे वयाच्या 83 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. विमल पवार या सुस्वभावी, प्रेमळ आणि सढळ हाताने मदत करणाऱ्या होत्या. त्यांच्या अंत्यविधीला पंचक्रोशीतील नागरिक, नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्या, शुक्रवार, दि. 20 रोजी सकाळी नऊ वाजता महू येथे सावडणे विधी होणार आहे.

त्यांच्या पश्चात दोन मुले, एक विवाहित मुलगी, सूना, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे. कामगार नेते रघुनाथ पवार यांच्या त्या भावजय, तर शिवसेनेचे सानपाडा विभागप्रमुख अजय पवार यांच्या त्या चुलती होत.

Post a Comment

0 Comments