सातारा जिल्ह्यातील पत्रकारांनी अधिस्वीकृती पत्रिकेसाठी अर्ज करावेत : अध्यक्ष हरिष पाटणे


सातारा जिल्ह्यातील पत्रकारांनी

अधिस्वीकृती पत्रिकेसाठी अर्ज

करावेत : अध्यक्ष हरिष पाटणे

साताऱ्यात नव्याने मंजूर झालेल्या पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिकेचे वितरण 

सातारा : माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पत्रकारांना निकषानुसार अधिस्वीकृती पत्रिका देण्यात येते. पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीने मंजूर केलेल्या सातारा जिल्ह्यातील विविध पत्रकारांच्या अर्जांना राज्य समितीने मंजुरी दिली आहे. त्यानुसार प्राप्त अधिस्वीकृती पत्रिकांचे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरीष पाटणे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.


जिल्हा माहिती कार्यालयात झालेल्या कार्यक्रमास समितीचे सदस्य गोरख तावरे, चंद्रसेन जाधव, पुणे विभागाच्या प्रभारी माहिती उपसंचालक वर्षा पाटोळे उपस्थित होते.


जुलै २०२४ मध्ये झालेल्या पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीने ५ पत्रकारांचे अधिस्वीकृतीचे अर्ज व सप्टेंबरमध्ये झालेल्या बैठकीत २ अधिस्वीकृती अर्ज विभागीय अधिस्वीकृती समितीने मंजूर केले होते. विभागीय समितीने मंजूर करून पाठवलेल्या या अर्जांना राज्य समितीमध्ये मंजुरी मिळाली होती. मंजूर झालेल्या अधिस्वीकृती पत्रिका अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरीष पाटणे यांच्या हस्ते पत्रकारांना वितरीत करण्यात आले.


सातारा जिल्ह्यातील पत्रकारांनी कागदपत्रांची पूर्तता करून अधिस्वीकृती पत्रिका मिळण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालय, सातारा येथे अर्ज करावेत, असे आवाहनही समितीचे अध्यक्ष हरीष पाटणे यांनी केले आहे.





Post a Comment

0 Comments