नीरा देवघर पाणीवाटप प्रश्न पेटणार!
खंडाळा, फलटणचं पाणी पळवतंय कोण? श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी पुराव्यांसहित केला खुलासा..!
संजीवराजे नाईक निंबाळकर विरुद्ध माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या संघर्ष भेटण्याची चिन्ह
सातारा : ज्या लाभक्षेत्रासाठी पाणी आहे त्याला क्षेत्राचे समाधान झाल्याशिवाय दुसरा कुठला विचार करता कामा नये, तसा जर तुम्ही विचार करत असाल तर तो खऱ्याअर्थाने संपूर्ण लाभ क्षेत्राचा शत्रू आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. बारामतीचा जो प्रश्न आहे ,तो श्रीमंत रामराजेसाहेब व आदरणीय शरद पवार साहेब यांनी सोडवण्याच्या दृष्टीने निर्णय केले असतील. त्याबाबत निवडणुकीनंतर त्यांचा विचार होईल, परंतु आत्ताच्या घटकेला मात्र निश्चितपणे ज्या लाभक्षेत्रासाठी पाणी आहे तिला लाभक्षेत्र सोडून ते पाणी कुठेही देऊ नये आणि ते आमची आग्रही भूमिका मांडत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी थेट माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना इशारा दिला आहे.
आरोप-प्रत्यारोप करत प्रचाराची रणधुमाळीची सांगता आज संध्याकाळी होत असतानाच फलटणमध्ये पाण्यावरून मात्र संघर्ष पेटण्याची चिन्ह दिसत आहेत. पंढरपूर, सांगोला, बारामती या ठिकाणी पाणी नेण्याच्या कारणावरून पाणी प्रश्न पेटण्याची चिन्ह आता दिसू लागली आहे. आज संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी तसा रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना इशारा दिला आहे.
निरा देवघरच्या पाण्याच्या संदर्भात भूमिका मांडताना संजीवराजे नाईक - निंबाळकर म्हणाले, फलटण तालुक्यामध्ये नीरा देवघर लाभक्षेत्र असून या लाभक्षेत्रामध्ये भिजणारी क्षेत्र आहे. त्याचबरोबर खंडाळा व माळशिरस तालुकाही आहे. त्याचा पाण्याचा प्रश्न आहे. त्यांचा पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आजच्या घटकाला निरा देवघर धरणाचे काम पूर्ण झालेले आहे. जे काही निरा देवघर धरणात पाणी येते ते वीर धरणाच्या माध्यमातून निरा उजवा कालवा आणि निरा डावा कालवा यांच्या माध्यमातून आता वापरले जात आहे. परंतु ज्यावेळी निरा देवघर धरणाचे वितरण व्यवस्था पूर्णत:स जाईल, त्यावेळेस हे सर्व पाणी वितरण व्यवस्थेमधून लाभक्षेत्रालाही ते पाणी जाणार आहे.
शासनाच्या नियमाप्रमाणे नवीन पाईपलाईनद्वारा पाणी द्यावे, अशा प्रकारचा जो ठराव झालेला आहे. त्याप्रमाणे काही प्रमाणात पाण्याची बचत होते. निरा देवघरच्या शासनाच्या नवीन धोरणानुसार पाईपलाईन देण्याचे धोरण आहे. त्या धोरणानुसार या पाण्याची बचत होणार आहे. हे पाणी माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी एक टीएमसी पाणी माळशिरस, एक एटीएमसी पंढरपूर, तर एक टीएमसी सांगोला तालुक्याला द्यावे अशा प्रकारच्या पत्राद्वारे माजी खासदारांनी शासनाकडे मागणी केली आहे. त्याचबरोबर माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापैकी दोन टीएमसी पाणी बारामतीला द्यावी, अशी शासनाकडे मागणी केलेली आहे, असे शासनाला दिलेले पत्र दाखवून त्यांनी आपली बाजू मांडली.
संजीवराजे म्हणाले, वास्तविक पाहता पाण्याची बचत होते, त्या पाण्याचा विचार केला, तर खंडाळा तालुक्यामध्ये निरा देवघरचे लाभक्षेत्र ४० टक्के क्षेत्र, फलटण तालुका तालुक्यातील ४२ टक्के क्षेत्र शिल्लक राहते, तर माळशिरसचे १४ टक्के क्षेत्र भिजायचे शिल्लक राहते. ज्या काही पाण्याची बचत होणार आहे ते पाणी या तीन तालुक्यांना याचाच अर्थ निरा देवघरच्या लाभक्षेत्रातच पाणी द्यावे लागणार आहे. या लाभक्षेत्राच्या बाहेर हे पाणी देऊन चालणार नाही. कायमस्वरूपी हे जर पाणी इकडे तिकडे गेले, तर सदर तीन तालुक्यातील क्षेत्र ओलिताखाली येणार नाही. त्याचा दूरगामी परिणाम खंडाळा, फलटण व माळशिरस तालुक्यावर होणार आहे. त्यामुळे हे पाणी याच लाभ क्षेत्रात मिळावे आणि नीरा उजवा कालव्याच्या माध्यमातून अनेक लिफ्ट व सायपण सिस्टीम्स योजना सुरू आहेत. त्यामुळे लाभ क्षेत्रातील पाणी हे त्या त्या तालुक्यातील लहान तहान भागवल्याशिवाय ते इतरत्र देऊ नये आणि पूर्ण पाणी हे लाभ क्षेत्रात लागणार आहे, अशी आजची परिस्थिती आहे, अशी दिसून येते. आमचे आग्रहाची भूमिका आहे, की हे पाणी इतरत्र कुठेही जाऊ देणार नाही. ज्या लाभ शहरासाठी पाणी आहे त्याच्या जमिनी या योजनेसाठी गेलेल्या आहेत. त्यांनाच ते पाणी मिळाले पाहिजे, असे आमची आग्रहाची भूमिका राहणार आहे. याकरिता कुठल्याही प्रकारचा संघर्ष करावा लागला, तरी आम्हाला त्या टोकापर्यंत जाण्याशिवाय पर्याय नाही, असा इशाराही संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिला आहे.
संजीवराजे म्हणाले, कारण जर आमच्या तालुका पाण्यापासून वंचित राहिला, तर पुन्हा कोणत्याही प्रकारे भरून न काढता येणारे नुकसान लाभक्षेत्रातील सर्व तालुक्यांचे झालेले असेल. हा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी शेतकऱ्यांचे समाधान करायचे असेल तर या प्रश्नाची जाण असणारी, तज्ञ असणारी किंवा रामराजेंसारखी संपूर्ण कृष्णा खोऱ्याच्या लवादाची माहिती असणारेसुद्धा हे आपल्यामध्ये आहेत. त्यांच्या माध्यमातून हा खरा प्रश्न सोडवला पाहिजे हा प्रश्न सोडवत असताना एक मात्र लक्षात ठेवले पाहिजे. ज्या लाभक्षेत्रासाठी पाणी आहे त्याला क्षेत्राचे समाधान झाल्याशिवाय दुसरा कुठला विचार करता कामा नये, तसा जर तुम्ही विचार करत असाल तर तो खऱ्याअर्थाने संपूर्ण लाभ क्षेत्राचा शत्रू आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. बारामतीचा जो प्रश्न आहे, तो श्रीमंत रामराजेसाहेब व आदरणीय शरद पवार यांनी सोडवण्याच्या दृष्टीने निर्णय केले असतील. त्याबाबत निवडणुकीनंतर त्यांचा विचार होईल, परंतु आत्ताच्या घटकेला मात्र निश्चितपणे ज्या लाभक्षेत्रासाठी पाणी आहे तिला लाभक्षेत्र सोडून ते पाणी कुठेही देऊ नये आणि ते आमची आग्रही भूमिका असणार आहे.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!