मतदान ओळ्खपत्राशिवाय १२ प्रकारचे ओळखपत्र मतदानासाठी ग्राह्य


मतदान ओळ्खपत्राशिवाय 

१२ प्रकारचे ओळखपत्र 

मतदानासाठी ग्राह्य

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४

सातारा : भारत निवडणूक आयोगाने मतदारांना छायाचित्रासह मतदार ओळखपत्र दिले आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करीता जे मतदार छायाचित्रासह मतदार ओळखपत्र मतदानाच्या वेळी सादर करू शकत नाही, अशा मतदारांना मतदानाच्या वेळी त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राव्यतिरिक्त पुढील १२ प्रकारचे कागदपत्रे मतदानाच्या वेळी ओळखपत्र पुरावा म्हणून ग्राह्य धरता येणार आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे.

यामध्ये आधार कार्ड, मनरेगाचे रोजगार पत्रक, बँक/पोस्ट ऑफिसने दिलेले छायाचित्रासह पासबुक, कामगार मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत दिलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहनचालक परवाना, पॅन कार्ड, रजिस्टर जनरल ऑफ इंडिया यांच्याकडून नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत दिलेले स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट, फोटोसह पेन्शन दस्तऐवज, केंद्र/ राज्य सरकार/सार्वजनिक उपक्रम/ पब्लिक लिमिटेड कंपन्या यांनी कर्मचाऱ्यांना दिलेले सेवा ओळखपत्र, खासदारांना/आमदारांना जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र आणि भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तिकरण मंत्रालयाने दिलेले विशेष विकलांगता प्रमाणपत्र यांचा समावेश आहे.

Post a Comment

0 Comments