आ. शिवेंद्रराजेंना राज्याच्या
मंत्रिमंडळात स्थान मिळावे
प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे यांची अपेक्षा
साताऱ्यात दलित महासंघ भाजपसोबत
सातारा : महायुती शासनाने तसेच केंद्र शासनाने मातंग समाजाच्या समृद्धीसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. दलित महासंघ आ. शिवेंद्रराजेंसोबत खंबीरपणे उभा असून त्यांना विक्रमी मतदान करणार आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीची सत्ता येईल. त्यात राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये आमदार शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद मिळावे, अशी अपेक्षा दलित महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे यांनी व्यक्त केली.
साताऱ्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार शिवेंद्रराजे भोसले, माजी उपनगराध्यक्ष अविनाश कदम, अमोल मोहिते, उमेश खंडुझोडे यांच्यासह दलित महासंघाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रा. सकटे म्हणाले, स्वर्गीय अभयसिंहराजे उर्फ भाऊसाहेब महाराज यांच्याशी माझा गेल्या ३० वर्षापासूनचा स्नेहबंध होता, तेच नेतृत्व तेच संस्कार तीच कार्यपद्धती ही आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची आहे. केंद्र शासनाने मातंग समाजाच्या समृद्धीसाठी अनेक उपयोगी निर्णय घेतले आहेत. राज्यांमध्ये सुद्धा महायुती सरकारने बार्टीच्या धरतीवर मातंग समाजासाठी वेगळे महामंडळ देण्याची घोषणा केली आहे, त्याचे मी स्वागत करतो. याशिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी व वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी १२० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत, हे अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय आहेत. आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचे व्यक्तिमत्व सर्वश्रुत आहे. त्यामुळे दलित महासंघाच्या वतीने त्यांना साताऱ्यात पाठिंबा जाहीर करण्यात येत आहे.
आ. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, आमदार या नात्याने मातंग समाजाच्या समस्यांसाठी कायम त्यांच्या बरोबर आहे. त्यांचे महत्त्वाचे प्रश्न विधानसभेमध्ये पोहोचवण्यामध्ये सुद्धा मी कुठेही कमी पडणार नाही. साताऱ्यातही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य होते. त्यामुळे येथील प्रतापसिंह महाराज हायस्कूल आणि सदर बाजार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य झालेला आमणे बंगला येथे राष्ट्रीय स्मारक करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाला निश्चित पाठपुरावा करून भूमिका घेण्यासंदर्भात परिस्थिती तयार करू, असे आश्वासन शिवेंद्रसिंहराजे यांनी दिले.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!