राज्याच्या मुख्यमंत्रीपदी
एकनाथ शिंदे यांना
पुन्हा संधी द्यावी
महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सहायक संघटनेची मागणी
सातारा : राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांना राज्याचे मुख्यमंत्री म्हणून संधी देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्यातील ग्राम रोजगार सहायक संघटनेचे जिल्हाध्यक्ष, राज्य कार्यकारिणी पदाधिकारी व तालुका कार्यकारिणी पदाधिकारी व सर्व ग्राम रोजगार सहाय्यकांच्या वतीने केली आहे.
ग्राम रोजगार सहायक संघटनेने पत्रकात म्हटले आहे की, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ग्रामीण स्तरातील सर्व विकासकामे करणाऱ्या घटकांना न्याय दिलेला आहे. शासनाच्या योजना गाव पातळीवर थेट लाभार्थीपर्यंत लाभ पोहचवण्याचं कार्य ग्राम रोजगार सहायकांच्या माध्यमातून केलं जातं. अशा महत्त्वाच्या घटकाला मागील १७ वर्षापासून सर्व झालेल्या मुख्यमंत्र्यांनी व सरकारने न्याय हक्कापासून वंचित ठेवले होते; परंतु एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी गाव विकासाचा मुख्य कणा असलेला ग्रामरोजगार सहायकाला आठ हजार रुपये मानधन व दोन हजार रुपये देऊन अनुग्रहित केले आहे. तसेच बहुमतामध्ये राज्याची सरकार जर पुन्हा महायुतीची निवडून आली, तर आम्ही दुसरा टप्पासुद्धा 16 हजार रुपये मानधनात वाढ करू, अर्धवेळीचा जीआर रद्द करून पूर्णवेळ करणार व ग्राम रोजगार सहायकाच्या कुटुंबाला विमा संरक्षण 50 लाख रुपये देणार असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे ग्रामरोजगार सहायकांनी गाव पातळीवर महायुती सरकारला सहकार्य करून संघटनेच्या वतीने कार्य करण्याच्या सूचना केलेल्या होत्या.
आज बहुमताने राज्याची महायुतीची सरकार स्थापित होत आहे आणि ही निवडणूक माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये लढवली गेली आहे. त्यामुळे शिंदे यांनाच मुख्यमंत्रीपदाचा भार सोपवावा, कारण सर्वसामान्यांचा लोकनेता अनाथाचे नाथ एकनाथ म्हणून व दिलेला शब्द पाळणारे मुख्यमंत्री म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची ख्याती आहे. सर्वसामान्य जनतेच्या हृदयात स्थान मिळवणारे मुख्यमंत्री म्हणून नावलौकिक प्राप्त झालेले आहे, असेही पत्रकात नमूद केले आहे.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!