रेठरे बुद्रुक : यशवंतराव मोहिते कृष्णा कारखान्याच्या ६५ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ करताना चेअरमन डॉ. सुरेश भोसले. बाजूस सौ. उत्तरा भोसले, डॉ. अतुलबाबा भोसले, जगदीश जगताप, संचालक मंडळ व इतर मान्यवर.
कृष्णा कारखान्याचे १५ लाख
मेट्रीक टन गाळपाचे उद्दिष्ट
: डॉ. सुरेश भोसले
कृष्णा कारखान्याच्या ६५ व्या गळीत हंगामास उत्साहात प्रारंभ
रेठरे बुद्रुक : कृष्णा कारखान्यात गाळपासाठी अत्याधुनिक मशिनरी बसविण्यात आली आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त गाळप शक्य होणार आहे. या हंगामात १५ लाख मेट्रीक टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, असे प्रतिपादन य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी केले आहे. कृष्णा कारखान्याच्या ६५ व्या गळीत हंगामाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.
चेअरमन डॉ. सुरेश भोसले व सौ. उत्तरा भोसले यांच्या हस्ते व कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत गव्हाणीत मोळी टाकून ६५ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाला कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीश जगताप, संचालक धोंडिराम जाधव, निवासराव थोरात, बाबासो शिंदे, बाजीराव निकम, शिवाजी पाटील, दत्तात्रय देसाई, जे. डी. मोरे, विलास भंडारे, वसंतराव शिंदे, अविनाश खरात, श्रीरंग देसाई, दीपक पाटील, कार्यकारी संचालक महावीर घोडके, बहेचे माजी उपसरपंच मनोज पाटील, वैभव जाखले यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. सुरेश भोसले म्हणाले, अत्याधुनिकीकरणामुळे ८० टक्के कारखाना नवीन झाला आहे. त्यामुळे यंदाचा गळीत हंगाम चांगल्या पद्धतीने पार पडेल, याची संचालक मंडळाला खात्री आहे. कामगारांचे प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचे संचालक मंडळाचे प्रयत्न असून, तोडणीबाबतच्या कोणत्याही तक्रारी उद्भवणार नाहीत, याबाबतही काळजी घेतली जात आहे.
डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले,निवडणुकीच्या निमित्ताने केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह कराडला आले असता, त्यांच्याकडे सहकारी उपसा जलसिंचन योजनांना सहकार्य करण्याची मागणी केली होती. याबाबत त्यांनी सकारात्मकता दर्शविली आहे. कारखान्याच्या संचालक मंडळाने प्रस्ताव दिल्यास केंद्र सरकारच्या माध्यमातून कृष्णा कारखाना संलग्नित सहकारी तत्वावरील उपसा जलसिंचन योजनांना मदत मिळू शकेल. कारखान्याचे चांगल्या पद्धतीने आधुनिकीकरण झाल्याने, यंदाचा हंगाम यशस्वीपणे पार पडेल.
प्रारंभी संचालक जे. डी. मोरे व त्यांच्या पत्नी सौ. सुमित्रा मोरे यांच्या शुभ हस्ते विधीवत पूजा करण्यात आली. यावेळी कारखान्याचे सभासद, बिगर सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, ऊस वाहतूकदार, कंत्राटदार, व्यापारी, कारखाना अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती.
तोडणीबाबतच्या अडचणी सोडविण्यासाठी हेल्पलाईन सुरू करणार
यंदाचा गळीत हंगाम सुरळितपणे पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. तोडणी कार्यक्रम वेळापत्रकानुसार काटेकोरपणे राबविण्याचे निश्चित करण्यात आले असून, तोडणीबाबतच्या अडचणी सोडविण्यासाठी कारखान्याच्यावतीने हेल्पलाईन सुरु करण्यात येणार असल्याची माहिती चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी दिली.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!