खंडाळ्यात ट्रॉमा सेंटर उभे करण्याची आमदारांना निवडणुकीत आता आठवण झाली का?


खंडाळ्यात ट्रॉमा सेंटर उभे

करण्याची आमदारांना आता

निवडणुकीत आठवण झाली का?

पुरुषोत्तम जाधव यांचा सत्ताधाऱ्यांना सवाल: खंडाळा तालुक्यात पुरुषोत्तम जाधव यांना गावभेटीस प्रचंड प्रतिसाद

खंडाळा : आता विधानसभा निवडणुकीत यांना खंडाळ्यात ट्रॉमा सेंटर उभे करण्याची आठवण झाली आहे. पाण्याची एक थेंबही तालुक्याबाहेर जाऊ देणार नाही याची आठवण झाली. मग १५ वर्षे काय केले? असा थेट सवाल वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभेचे अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांनी विद्यमान आमदारांना केला आहे.

अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांच्या खंडाळा तालुक्यातील संपर्क दौऱ्याला प्रतिसाद मिळत असून, गाव भेट प्रचार दौऱ्याप्रसंगी ते बोलत होते.


पुरुषोत्तम जाधव म्हणाले, खंडाळा तालुक्याच्या पाणी प्रश्नाचा पुळका आलेल्या विद्यमान आमदारांना गेल्या २५ वर्षात पाणी प्रश्न का सोडवता आला नाही? खंडाळा तालुक्याचा फक्त मतापुरता वापर करणाऱ्या मूकनायक आमदारांना त्यांची जागा दाखवून द्या. वडील १० वर्षे खासदार हे १५ वर्षे आमदार अशी २५ वर्षे सत्ता घरात असूनही यांना वाई तालुक्यातील कवठे केंजळ योजना देखील पूर्ण करता आली नाही. 

वाई शहराला भेडसावणारा पार्किंगचा प्रश्न सोडवता आला नाही. ज्या किसन वीर आबांच्या नावाने राजकारण करतायत त्यांचे स्मारक अद्याप धूळखात पडलेय ते सुशोभित करता आले नाही. 

पुरुषोत्तम जाधव यांच्या खंडाळा तालुक्यातील संपर्क दौऱ्याला मोठा प्रतिसाद मिळाला असून त्यांनी पारगाव ,खंडाळा, बावडा, भादवडे, शिवाजीनगर, मोरवे, अहिरे, सुखेड, बोरी, खेड ,लोणंद ,कोपर्डे, निपोडी, पाडळी, धावडवाडी, घाटदरे, हरळी या गावात जाऊन प्रत्यक्ष मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या व परिवर्तनात सहभागी होण्याचे आवाहन केले.

Post a Comment

0 Comments