ज्येष्ठांच्या साथीमुळे
शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठीवर
वडिलकीचा हात कायम
सातारा : शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे वडील स्व. अभयसिंहराजे भोसले उर्फ भाऊसाहेब महाराजांनी त्यांच्या उमेदीच्या काळात असंख्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन सातारा तालुक्यात सहकारक्रांती घडवली. आज अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना व अजिंक्य उद्योग समूहातील विविध संस्थांच्या माध्यमातून स्व. भाऊसाहेब महाराजांचा गट सातारा तालुक्यात आजही शिवेंद्रसिंहराजे यांच्यासोबत सक्षमपणे समाजकारण आणि राजकारणात सक्रिय आहे.
या 'अजिंक्य' गटामधील स्व. भाऊसाहेब महाराजांच्या सोबतीचे ज्येष्ठ, जुने, जाणते कार्यकर्ते शिवेंद्रसिंहराजेंसाठी कायम मार्गदर्शक राहिले आहेत. सर्व जुने, ज्येष्ठ कार्यकर्ते आणि शिवेंद्रसिंहराजेंसोबतची नवीन युवा कार्यकर्त्यांची सांगड घालून शिवेंद्रसिंहराजेंची समाजकारणातील वाटचाल अखंडपणे सुरू आहे.
परळी भागाच्या दौऱ्यावर असताना स्व. भाऊसाहेब महाराजांच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या एका ज्येष्ठ सहकाऱ्याची शिवेंद्रसिंहराजेंनी आवर्जून भेट घेतली. श्री. गजानन महादेव कोठावळे उर्फ दादा कोठावळे (वय ७७) यांच्या निवासस्थानी त्यांनी सदिच्छा भेट दिली. दादांच्या हाताला इजा झाली आहे. त्यांच्या तब्बेतीची विचारपूस करून शिवेंद्रसिंहराजेंनी त्यांचे आशीर्वाद घेतले.
दादा स्व. भाऊसाहेब महाराज यांच्यासोबत १९७८ पासून कार्यरत होते. अजिंक्य दूध संघाचे चेअरमन राहिलेल्या दादांची भेट झाल्याने जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला. शिवेंद्रसिंहराजेंच्या गावभेट दौऱ्यामध्ये दादांसारखे अनेक ज्येष्ठ, जुने जाणते मार्गदर्शक त्यांना भेटतात आणि आपुलकीने जवळ घेऊन पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद देतात. त्यावेळी शिवेंद्रसिंहराजेंना आनंद तर होतोच पण, त्यांचे मनही भरून येते. आज स्व. भाऊसाहेब महाराज आपल्यात नसले तरी या जुन्या ज्येष्ठांच्या सहवासाने स्व. भाऊसाहेब महाराज शिवेंद्रसिंहराजेंच्या सोबत कायम असल्याची जाणीव यानिमित्ताने सोबतच्या कार्यकर्त्यांना होते.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!