विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या
आकाशकंदीलने दिले मतदान
जनजागृतीचा संदेश
वाघमोडेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा अनोखा उपक्रम
सातारा : सातारा जिल्हा परिषदेची माण तालुक्यातील गोंदवलेकर महाराजांच्या नगरीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघमोडेवाडी यांनी राबवला अनोखा उपक्रम राबवला.
मतदान जनजागृतीचा संदेश लोकांपर्यंत कसा पोहोचवायचा असा प्रश्न या शाळेतील नवोपक्रमशील शिक्षिका सौ. भारती ओंबासे यांना पडला. तेव्हा त्यांनी शाळेमध्ये आकाशकंदील निर्मिती कार्यशाळा घेऊन विद्यार्थ्यांना आकाशकंदील तयार करण्यास सांगितले. प्रत्येक आकाशकंदीलवर निर्मिती कार्यशाळा घेऊन विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे आकाशकंदील तयार करण्यास सांगितले व प्रत्येक आकाशकंदीलवर एक घोषवाक्य लिहून आणा, असे सांगितले. आज शाळेचा एकूण 49 पट आहे आणि 49 विद्यार्थ्यांनी आकाशकंदील बनवून मतदान जनजागृती केली.
मतदान जनजागृतीसाठी बऱ्याच शाळामध्ये रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा ,घोषवाक्य स्पर्धा अशा एक ना अनेक विविध स्पर्धा, शाळांमध्ये राबवल्या जातात परंतु त्या स्पर्धा शाळेपुरत्या मर्यादित राहतात. ग्रामीण भागातला हा स्तुत्य उपक्रम ठरला आहे...नुकतीच दिवाळी आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेल्या आकाश कंदील घरोघरी लागतील.त्याचबरोबर मतदान जनजागृती संदेश घरोघरी तर पोह्चतीलच पण शेजारी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना ते संदेश पाहायला मिळतील. शाळेतील या उपक्रमाचे कौतुक सर्वत्र होत आहे .
या उपक्रमासाठी शाळा व्यवस्थापन अध्यक्ष सदस्य व सर्व पालक शाळेचे मुख्याध्यापक दादा कट्टे, पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे ,शिक्षण विस्ताराधिकारी रमेश गंबरे, केंद्रप्रमुख सौ. शोभा पवार सर्वांनी परिश्रम घेतले.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!