महाबळेश्वरची लेक होणार खंडाळ्याची सून..!
पुरुषोत्तम जाधव यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दोन तालुक्यांच्या नात्यांची केली बेरीज त्यांचे सुपुत्र शुभंकर व महाबळेश्वरचे कोंढाळकर घराण्यातील सायली लवकरच लग्न बंधनात
खंडाळा : कै. ह. भ. प. बाजीराव आनंदराव जाधव यांचे नातू व पुरुषोत्तम बाजीराव जाधव यांचे चिरंजीव चि. शुभकंर पुरुषोत्तम जाधव (रा. अतिट, ता. खंडाळा, जि. सातारा) आणि महाबळेश्वरचे माजी उपनगराध्यक्ष हे मूळचे वाई तालुक्यातील पश्चिम भागातील बोरगाव येथील आहेत.
लक्ष्मण कोंढाळकर यांची नात व बाळकृष्ण कोंढाळकर यांची कन्या सायली यांचा महाबळेश्वर येथे आज कुंकुम तिलक सोहळा नुकताच पार पडला.
या सोहळ्यामुळे खंडाळा तालुका आणि वाई महाबळेश्वर तालुक्याचे नाते दृढ झाले आहे.
पुरुषोत्तम जाधव हे राजकारण, समाजकारण व क्रीडा क्षेत्रात मोठे काम करीत असून, महाबळेश्वर येथील कोंढाळकर कुटुंबीयदेखील राजकारण, समाजकारणात कार्यरत आहे. आता या नव्या स्नेहबंधामुळे खंडाळा व महाबळेश्वर, वाईचे आप्तेष्टांचे नाते जुळले आहे.
चि. शुभंकर व चि. सौ. का. सायली यांचा भव्य शाही विवाह सोहळा लवकरच होणार आहे.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!