कुसुर येथील खून प्रकरणी
गावातीलच एकास अटक
आर्थिक देवाणघेवाणीतून खून झाल्याचा २१ दिवसांनंतर उलघडा
सातारा : कुसुर येथील शिवाजी लक्ष्मण सावंत (वय ५२) या दोन सप्टेंबर २०२४ रोजी बेपत्ता झालेल्या व्यक्तीचा मृतदेह दि. पाच सप्टेंबरला कोळेवाडी येथील माळ नावाच्या शिवारातील भुईमुगाच्या शेतात आढळून आला होता. याप्रकरणी अज्ञातावर खुनाचा गुन्हा कराड ग्रामीण पोलिसांनी नोंद करून तपासाला गती दिली होती.
कराड ग्रामीण पोलीस आणि सातारा येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांच्या संयुक्त माध्यमातून तपास सुरू होता. स्थानिक चौकशी व तांत्रिक तपासावरून पोलिसांनी शिवाजी सावंत यांचा कुसूर गावातीलच दिलीप कराळे या संशयिताने विळयासारख्या धारदार हत्याराने खून केल्याचे उघडकीस आणले. या गुन्ह्यात संशयित दिलीप कराळे याला पोलिसांनी अटक केली आहे. आर्थिक देवाण-घेवाणीच्या वादातून कराळे यांनी शिवाजी सावंत यांचा खून केल्याची माहिती साताऱ्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी कराड येथे दिली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, कराडचे पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर, कराड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, एलसीबीचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्यासह तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!