महायुती सरकारच्या काळात महाराष्ट्र दरडोई उत्पन्नात सहाव्या क्रमांकावर
सातारा जिल्हा काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेशराव जाधव; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सातारा : महाराष्ट्रातील सार्वजनिक उपक्रम, महामंडळे व कंपन्यांतील संचित तोट्यातील महामंडळाची चौकशी होण्याबाबत जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष डॉ सुरेशराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई, महिला प्रदेश सचिव धनश्री महाडिक, कोरेगाव तालुकाध्यक्ष ॲड. श्रीकांत चव्हाण, संदीप माने, आनंदराव जाधव,अन्वर पशाखण, डॉ. शंकरराव पवार, मालन परळकर, मनोज्ञ तपसे आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र हे प्रगतशील राज्य आहे. मात्र, महायुती सरकारने राज्याची मोठ्या प्रमाणात अधोगती केली असून, दरडोई उत्पन्नात आघाडीवर असणारा महाराष्ट्र या महायुती सरकारच्या काळात सहाव्या क्रमांकावर फेकला गेल्याचे आर्थिक पाहणी अहवालात स्पष्ट झाले आहे. राज्यावर आठ लाख कोटी रुपयांचे कर्ज झाले आहे.
राज्य सरकारच्या गलथान कारभारामुळे आर्थिक बेशिस्तपणा वाढला आहे. यामध्ये भर म्हणून या सरकारचे कमिशन राज जोरात सुरू आहे. या धोरणानुसार हजारो कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू केले, पण त्यामधून राज्याचे भले होण्यापेक्षा सरकार त्यांच्या मित्रांचे भले करत आहे. राज्यातील ११० सार्वजनिक उपक्रम, महामंडळे व कंपन्यांतील ४१ महामंडळाचा तोटा ५० हजार कोटींच्या वर गेला आहे. हा सर्व पैसा मंत्री, अधिकारी आणि ठेकेदारांच्या खिशात गेला आहे.
हा सर्व पैसे हा राज्यातील जनतेचे असून ते नेमके कुठे खर्च झाले? याबाबतची चौकशी होणे आवश्यक आहे. तरी याबाबत आपल्या स्तरावरून योग्य त्या चौकशीसाठी कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली.

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!