किसन वीर व खंडाळा कारखान्याचे ऊस बिल जमा

 


किसन वीर व खंडाळा साखर 

कारखान्याचे ऊस बिल जमा

१६ कोटी ७६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग

सातारा : किसन वीर व खंडाळा कारखान्याकडे १ ते १५ डिसेंबरपर्यंत गळितास आलेल्या उसाच्या बिलाची रक्कम प्रति मेट्रिक टन ३ हजार रुपयांप्रमाणे १६ कोटी ७६ लाख ८१२ एवढी रक्कम संबंधित ऊस उत्पादक सभासद व बिगर सभासदांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आल्याची माहिती किसन वीर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी माहितीपत्रकाद्वारे दिली आहे. 

पत्रकात म्हटले आहे, की कारखान्याचे चेअरमन आमदार मकरंदआबा पाटील यांनी सुतोवाच केल्याप्रमाणे नुकतीच नोव्हेंबर महिन्याची बिलेही आपण शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलेली आहेत. आज (दि. १३) डिसेंबरमध्ये १ ते १५ या कालावधीत गाळपास आलेल्या उसाचे बिल १६ कोटी ७६ लाख ८१२ रुपये ऊस उत्पादकांच्या खात्यावर वर्ग केलेले आहेत. साखरेच्या भावामध्ये चढ-उतार तसेच साखरेस उठाव नसल्याने आपल्या संचालक मंडळास बिले देण्यास विलंब होत आहे. उर्वरित पंधरवड्यांची बिलेही लवकरात लवकर जमा करणार आहे. सभासदांनी आतापर्यंत जो संयम व विश्वास संचालक मंडळावर दाखविला आहे, त्याबद्दल संचालक मंडळाच्यावतीने आभार श्री. शिंदे यांनी मानले आहेत.

Post a Comment

0 Comments