मुनावळे वॉटर पार्कचे श्रेय
आमदार शिवेंद्रराजे भोसलेंनाच
राजू भोसले, ज्ञानेश्वर रांजणे व भिकुभाऊ भोसले यांची माहिती
सातारा : सातारा-जावलीचे भाजपचे कार्यसम्राट आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा जावली विधानसभा मतदारसंघाच्या विकासकामासाठी अहोरात्र परिश्रम घेतले आहेत. अनेक विकासकामे गतीने होत असून आज होणाऱ्या मुनावळे येथील वाटर पार्कच्या पायाभरणी ही आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीच केली आहे. त्यांच्या उपस्थितीत भूमिपूजन होत आहे. याचा आनंद वाटत असल्याची माहिती सातारचे युवा नेते राजू भोसले व जावलीचे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक ज्ञानेश्वर रांजणे व भिकुभाऊ भोसले यांनी सातारा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
कोयना धरणामुळे विस्थापित झालेल्या अनेकांना आपलं गाव, शिवार व घरदार जमीन जुमला सोडून दुसऱ्या ठिकाणी पुनर्वसन व्हावे लागलेले आहे. परंतु, ज्यांनी आपल्या मातृभूमीमध्ये थांबून या भागातील निसर्ग व नैसर्गिक साधनसामग्री जपली आहे. त्यांच्या उदरनिर्वाहासाठी पर्यटन वाढीच्या दृष्टीने आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले आहेत. एवढेच नव्हे तर कोविड काळातही त्यांनी या दुर्गम भागामध्ये दिलासा देण्याचे काम केले. या या दुर्गम भागाला वाटर पार्क व इतर सुविधांमुळे खूप मोठे महत्त्व प्राप्त झालेले आहे. परंतु, स्थानिक भूमिपुत्रांसाठी रोजगार उपलब्ध नव्हता. याची जाणीव ठेवून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व मान्यवर नेते तसेच आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पर्यटन वाढीसाठी पुणे, मुंबई व इतर ठिकाणच्या धर्तीवर मुनावळे, तापोळा, बामणोली या ठिकाणी पर्यटन वाढीसाठी वॉटर स्पोर्ट्स निर्माण करणे गरजेचे आहे. अशी महत्वपूर्ण मागणी अनेकदा केली होती. एवढेच नव्हे तर मंत्रालय पातळीवर बैठकी घेण्यात आल्या होत्या. या बैठकीचे सर्व कागदपत्र पर्यटन विभाग व महसूल विभागाकडे उपलब्ध आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुनावळे या ठिकाणी वॉटर स्पोर्ट्स उभारणी केली जात आहे. या सर्व कामाचे खरं म्हणजे श्रेय हे फक्त आणि फक्त आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचेच आहे. याची माहिती जनतेला व्हावी. यासाठी आज तातडीने पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात आली.
या वेळेला स्थानिक भूमिपुत्र व ग्रामस्थ निलेश भोसले, पांडुरंग भोसले, रमेश भोसले, तात्याबा भोसले, संदीप जांभळे, विलास चव्हाण, किरण भोसले उपस्थित होते. ज्यांनी काम केलेले आहे त्यांना कामाचे श्रेय देणे ही जावली तालुक्याची संस्कृती आहे. आमदार भोसले यांनी केलेल्या प्रयत्नाबद्दल स्थानिक ग्रामस्थ व मान्यवरांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!