ऑन्को लाईफ केअर ट्रस्टतर्फे आयोजित शिबिरात १०४ रक्तदात्यांनी केले रक्तदान

 


ऑन्को लाईफ केअर ट्रस्टतर्फे

आयोजित शिबिरात १०४

 रक्तदात्यांनी केले रक्तदान

सातारा : विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे. याच अनुषंगाने नागरिकांमध्ये रक्तदानाचे महत्त्व रुजविणे आणि त्यांना रक्तदानासाठी पुढे येण्याकरिता ऑन्को लाईफ केअर ट्रस्ट सातारा व अक्षय ब्लड बॅंक यांच्या संयुक्त विद्यामाने जागतिक महिला दिना निमित्ताने रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.

ज्यांचं जीवन एखाद्या गंभीर आजारामुळे धोक्यात आहे. अशा व्यक्तींना योग्य वेळी रक्त मिळाल्यास त्यांचा किमती जीव वाचू शकतो. याव्यतिरिक्त, रक्ताचा उपयोग गुतांगुतीचे आजार, जटिल वैद्यकीय शस्त्रक्रिया यामध्ये गरजेचे असते. सुरक्षित आणि पुरेशा रक्त उपलब्ध असेल प्रसूतीदरम्यान आणि नंतर गंभीर रक्तस्त्राव झाल्यामुळे मृत्यू आणि अपंगत्वाचे प्रमाण कमी करण्यासही गरजेचे असते. यासाठी रक्तदान किती महत्त्वाचे आहे हे या शिबिरातंर्गत पटवून देण्यात आले. 


या शिबिरातंर्गत रक्तदानाचे महत्त्व पटवून देण्यात आले. ऑन्को लाईफ केअर ट्रस्टच्या वतीने दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. कर्करोग प्रतिबंध तसेच उपचारांबाबत मार्गदर्शन करण्यात ट्रस्टच्या वतीने नेहमीच पुढाकार घेतला जातो. तसेच रक्ताची वाढती गरज ओळखून रक्तदान शिबिरात राबविण्याचे मोलाचे कार्य याठिकाणी करण्यात आले. या शिबिरांचे अध्यक्ष रितेश रावखंडे तर प्रमुख अतिथी म्हणून ऑन्को लाईफ केअर कॅन्सर सेंटरचे संचालक उदय देशमुख यांची विशेष उपस्थिती होती. त्याचबरोबर ऑन्को लाईफ कॅन्सर हॉस्पीटलचे संचालक डॉ. प्रताप राजेमहाडिक, सचिन देशमुख , डॉ. पुष्पलता मोतलिंग आदी मान्यवर उपस्थित होते. यामध्ये एकूण १०४ रक्तदाते सहभागी झाले होते. हे शिबिर यशस्वीपणे पार पाडण्यात ऑन्कोचे डॅा. प्रसाद कवारे आणि श्वेता जाधव यांचा मोलाचा वाटा होता, तर अक्षय ब्लड बॅंकचे विशेष सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments