नरेंद्र मोदी हेच भारताचे विकासपुरुष :
भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम
सातारा येथे पुणे - मिरज डबलिंग लाइनच्या व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उदघाट्न
सातारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कालखंडात संपूर्ण भारतात अनेक प्रकल्प राबवले गेले. अंत्योदयासाठी योजना आखल्या गेल्या, राबवल्या गेल्या आणि समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत लाभ कसा मिळेल यासाठी कामं केले गेले. याच अनुषंगाने भारतीय रेल्वेचे महत्व लक्षात घेऊन मोदींनी वंदे भारत ट्रेन सुरू केली. अनेक मार्ग मोठे केले, रेल्वेमध्ये अनेक सोयीसुविधा निर्माण केल्या. रेल्वेसारखे स्वस्त वाहतुकीच्या साधनाची उपलब्धता जास्त प्रमाणात केली तर पर्यटन, व्यापार दोन्हीसाठी फायदेशीर ठरेल हे ओळखून अनेक स्टेशनचे नूतनीकरण केले. काही स्थानके नवीन तयार केली.
आज सातारा रेल्वे स्टेशनवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सातारा येथे पुणे -मिरज डबलिंग लाइनच्या उदघाट्न कार्यक्रम व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता. सातारा रेल्वे स्टेशन येथे भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सातारा रेल्वे येथील वन स्टेशन वन प्रॉडक्ट ( OSOP ) च्या स्टॉल सातारी कंदी पेढा आणि माहुली येथील महिलांनी बनवलेल्या बिस्कीट कुकीज़ची विक्री स्थानिक महिलांमार्फत केली जाते. या OSOP स्टॉल वर रेल्वे तिकिटाच्या ऑनलाइन बुकिंगची व्यवस्था असून, याचे मासिक भाडे फक्त 2000 रुपये आहे,तसेच प्रत्येक महिन्यात की सुविधा है इसकी 40 युनिट लाईट फ्रीमध्ये दिली जाते. भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी या स्टॉल ला भेट देऊन त्यांच्याकडून पूर्ण माहिती घेतली आणि शुभेच्छा दिल्या. या वेळी त्यांनी मनोगत व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींना धन्यवाद व्यक्त केले.
सातारा स्टेशन येथे कोऑर्डिनेटर ऑफिसर विजय सिंह दादास, सीनियर डीएमई पुणे आणि श्री राकेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमासाठी भारतीय जनता पार्टीचे सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, सातारा जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे, रवी आपटे, धनंजय पाटील, महेंद्र कदम, रवी लाहोटी, ओबीसी महिला सातारा शहराध्यक्ष गौरी गुरव, पिंटू कुमार मुख्य वाणिज्य निरीक्षक सातारा, श्री मनोज गुप्ता सीसीआई गुड्स पुणे, तोमर सिंह मीना वेलफेयर इंस्पेक्टर पुणे, रविचंद्र कुमार स्टेशन मैनेजर सतारा, आर मानकर एसएससी इलेक्ट्रिकल सतारा, किशोर शिंदे उपनगराध्यक्ष, सतीश जाधव, विजय बड़ेकर माजी नगराध्यक्ष, राजू भोसले उपनगराध्यक्ष, एडवोकेट विनीत पाटील ZRUCC मेंबर, श्रीकांत आंबेकर नगरसेवक, बबनराव देवरे पंचायत समिती सदस्य, राम हदगे, नूतन सावंत सरपंच क्षेत्र माहुली, पंकज लाहोटी, जवाहर नवोदय विद्यालय आणि श्रीराम हायस्कूलचे विद्यार्थी आणि एसएससीचे सदस्य सहभागी झाले होते.


0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!