‘किसन वीर’च्या
कामगारांचीही
दिवाळी गोड!
दोन महिन्यांचे वेतन बँक खात्यावर जमा; ५ किलो साखरेचेही वाटप
वाई : प्रतिनिधी
किसन वीर सहकारी साखर कारखाना आणि खंडाळा सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना साखर देऊन दिवाळी गोड केल्यानंतर आता कारखान्यातील कामगारांसाठीही चेअरमन तथा राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंदआबा पाटील यांनी दिवाळीची भेट दिली आहे. कामगारांना दोन महिन्यांचे वेतन त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले असून, प्रत्येकी ५ किलो साखरेचे वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
गेल्या सात-आठ वर्षांपासून कारखान्याच्या सभासद व बिगर सभासदांना साखर वाटपाची परंपरा बंद होती. चेअरमन मकरंदआबा पाटील, खासदार नितीनकाका पाटील आणि संचालक मंडळाने ही परंपरा पुन्हा सुरू करून शेतकऱ्यांना दिवाळीची भेट दिली. त्याच धर्तीवर आता कारखान्यातील कामगारांनाही दोन महिन्यांचे वेतन आणि साखर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
‘शेतकरी आणि कामगार ही कारखान्याची दोन चाके’ असल्याचे सांगत कामगारांच्या दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्याचा निर्णय घेण्यात आला. किसन वीर व खंडाळा हे दोन्ही कारखाने सध्या पूर्ण क्षमतेने सुरू असून, संचालक मंडळाने निश्चित केलेल्या गाळप उद्दिष्टाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.
दरम्यान, कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी आपला संपूर्ण ऊस किसन वीर व खंडाळा कारखान्याला गाळपासाठी देऊन सहकार्य करावे, असे आवाहन व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी केले. चेअरमन मकरंदआबा पाटील, खासदार नितीन पाटील आणि संचालक मंडळाच्या वतीने सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छाही देण्यात आल्या.

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!