बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेतील त्रुटीबाबत लवकरच मंत्रालयात बैठक
नायगाव येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अध्यक्ष हरिष पाटणे यांना ग्वाही
सातारा : ज्येष्ठ व वयोवृद्ध पत्रकारांसाठी असलेल्या बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेतील त्रुटीबाबत लवकरच मंत्रालयात बैठक लावू, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
नायगाव (ता. खंडाळा) येथे सावित्रीबाई फुले जयंती सोहळ्यावेळी महाराष्ट्र शासनाच्या पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरिश पाटणे, सदस्य चंद्रसेन जाधव यांनी मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने व्यासपीठावर मुख्यमंत्र्यांना याबाबत लेखी निवेदन दिले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी उपरोक्त आश्वासन दिले.
सातारा, पुणे, सोलापूर जिल्ह्यातील वयोवृध्द पत्रकारांचे बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेचे प्रस्ताव परत येत असल्याने, बराच काळ प्रलंबित राहत असल्याने पत्रकारांनी याबाबत लक्ष घालण्याची मागणी केली होती. योजना असूनही पात्र व गरजू पत्रकारांना लाभ मिळत नाही. पुणे विभागातील सातारा, पुणे, सोलापूर जिल्ह्यातील वयोवृध्द पत्रकारांचे प्रस्ताव मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.
या विषयावर मंत्रालयात मुख्यमंत्री महोदय, मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, किरण नाईक, माहिती व जनसंपर्क विभागाचे उच्च पदस्थ अधिकारी अशी स्वतंत्र बैठक लावावी, अशी मागणी पाटणे यांनी केली. त्यावर लगेचच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लवकरच बैठक लावू, अशी ग्वाही दिली.

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!