‘छत्रपती दहीहंडी महोत्सवा’ची
साताऱ्यात जय्यत तयारी
सौ. शिवानीताई प्रीतम कळसकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजनाला वेग
खा. श्री. छ. उदयनराजे यांच्या हस्ते स्टेज बांधणीचा शुभारंभ
गोविंदांच्या जल्लोषासाठी सातारानगरी सज्ज
संतोष शिराळे | सातारा
साताऱ्याच्या सांस्कृतिक आणि उत्सवी परंपरेला नवी ऊर्जा देणाऱ्या ‘छत्रपती दहीहंडी महोत्सव २०२६’च्या तयारीला वेग आला आहे. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती युवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या या भव्य महोत्सवाच्या स्टेज बांधणीचा शुभारंभ तालीम संघ, सातारा येथे उत्साहात करण्यात आला. सौ. शिवानीताई प्रीतम कळसकर यांच्या नेतृत्वाखाली पाचव्या महोत्सवाच्या नियोजनाला विशेष गती मिळाली असून, यंदाचा दहीहंडी महोत्सव भव्य-दिव्य करण्यासाठी जय्यत तयारी सुरू झाली आहे.
भगवान श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवाचा आनंद, गोविंदांच्या उत्साहाचा जल्लोष आणि साताऱ्याच्या एकजुटीचे दर्शन घडविणारा हा महोत्सव यंदा आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. दहीहंडी हा केवळ मनोरंजनाचा उत्सव नसून संघभावना, धाडस, एकजूट आणि उत्साहाचा उत्सव आहे. गोविंदा पथकांचे थरारक मनोरे, ढोल-ताशांचा गजर आणि हजारो नागरिकांची उपस्थिती यामुळे सातारा शहर उत्सवी रंगात न्हाऊन निघणार आहे.
उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली महोत्सवाचे नियोजन करताना सौ. शिवानीताई कळसकर आणि प्रितम कळसकर यांनी आयोजनाची धुरा सांभाळली आहे. महोत्सवाच्या माध्यमातून साताऱ्याच्या पारंपरिक उत्सवी वातावरणाला आधुनिक स्वरूप देतानाच नागरिक, युवक आणि गोविंदा पथकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे यंदाच्या ‘छत्रपती दहीहंडी महोत्सवा’कडे शहरवासीयांचे विशेष लक्ष लागले आहे.
स्टेज बांधणीच्या शुभारंभप्रसंगी भाजपा सातारा लोकसभा संयोजक सुनील काटकर, सातारा नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष दत्तात्रय बनकर, रक्षक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुशील मोझर, पक्षप्रतोद निशांत पाटील, नियोजन सभापती अशोक शेडगे, नगरसेवक मनोज शेंडे, पंकज चव्हाण, प्रशांत आहेरराव, सागर पावशे, माजी नगरसेवक किशोर शिंदे, विजय बेडेकर, सौ. शिवानीताई कळसकर, प्रितम कळसकर, राहुल गायकवाड, सनी भोसले, केदार राजेशिर्के, किरण कुऱ्हाडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
“साताऱ्याच्या नागरिकांसाठी दहीहंडीचा हा उत्सव केवळ जल्लोषाचा नसून एकजुटीचा आणि आपल्या सांस्कृतिक परंपरेचा उत्सव ठरावा,” या भावनेतून महोत्सवाचे नियोजन करण्यात येत आहे. सातारा शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन ‘छत्रपती दहीहंडी महोत्सव २०२६’चा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजक सौ. शिवानीताई प्रीतम कळसकर आणि प्रितम कळसकर यांनी केले आहे.



0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!