सायळीच्या जिल्हा परिषद शाळेच्या नूतन इमारतीचे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते उद्घाटन

सायळीच्या जिल्हा परिषद शाळेच्या नूतन इमारतीचे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते उद्घाटन

सातारा | प्रतिनिधी

सायळी (ता. जि. सातारा) येथील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेच्या अत्याधुनिक नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थ्यांना सुरक्षित, दर्जेदार आणि आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेल्या या नूतन वास्तूमुळे शाळेच्या शैक्षणिक वातावरणाला नवी दिशा मिळणार आहे.

नवीन इमारतीमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसह शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन विविध आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये CCTV कॅमेऱ्यांसह आवश्यक अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्या असून, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अधिक सुरक्षित व पोषक वातावरण मिळणार आहे.

यावेळी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विद्यार्थी व शिक्षकांना शुभेच्छा देत, नव्या वास्तूचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी प्रभावी उपयोग व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. नूतन इमारतीमुळे विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या सुविधा मिळून शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी भर पडण्यास मदत होणार आहे.

या लोकार्पण सोहळ्यास भाई वांगडे, संतोषदादा भोसले, श्रीरंग देवरुखे, वसंतराव भंडारे (सदस्य, पंचायत समिती, सातारा), शोभाताई लोटेकर (सदस्य, पंचायत समिती, सातारा), अजित साळुंखे (जिल्हा परिषद सदस्य, नागठाणे), सुरेश सावंत, प्रवीण माने, जयश्री शिंगाडे, बबन देवरे, चंद्रकांत दादा वांगडे, प्रतीक शिंदे, महेश शेठ देवरे, संजय शेठ जाधव यांच्यासह विविध मान्यवर, शिक्षक, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments