मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी करणार; आरोग्यमंत्री ना. प्रकाश आबिटकर, उद्योगमंत्री उदय सामंत यांचे प्रतिपादन


मंगेश चिवटे यांच्या

उमेदवारीसाठी मुख्यमंत्री,

उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार

कोल्हापुरात आरोग्यमंत्री ना. प्रकाश आबिटकर, उद्योगमंत्री उदय सामंत यांचे प्रतिपादन

कोल्हापूर | प्रतिनिधी

पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून आरोग्यदूत मंगेश चिवटे यांना महायुतीकडून उमेदवारी मिळावी, यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि सुनेत्राताई पवार साहेब यांच्याकडे ठामपणे मागणी करणार असल्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाशजी आबिटकर साहेब यांनी स्पष्ट केले.

शिक्षक हा समाजाचा दिशादर्शक आणि भावी पिढी घडविणारा महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे शिक्षकांच्या प्रश्नांची जाण असलेला, त्यांच्याशी सातत्याने संवाद ठेवणारा आणि त्यांच्या हक्कांसाठी शासनदरबारी ठामपणे आवाज उठवू शकणारा लोकप्रतिनिधी शिक्षक मतदारसंघाला मिळणे गरजेचे आहे. मंगेश चिवटे यांनी रुग्णसेवा आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या मनात विश्वासाचे स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या या कार्याचा व्यापक उपयोग शिक्षक समाजाच्या प्रश्नांसाठी व्हावा, यासाठी त्यांना लोकप्रतिनिधित्वाची संधी मिळणे आवश्यक असल्याचे आबिटकर साहेबांनी नमूद केले.

मंगेश चिवटे यांच्या कार्याचा उल्लेख करताना आबिटकर साहेब म्हणाले की, “रुग्णाच्या मदतीसाठी दिवस-रात्र धावून जाणारा, अडचणीत असलेल्या कुटुंबाला आधार देणारा आणि कोणत्याही परिस्थितीत मदतीचा हात पुढे करणारा कार्यकर्ता आज महाराष्ट्राने पाहिला आहे. अशा कार्यकर्त्याला आता शिक्षकांच्या प्रश्नांसाठी व्यापक व्यासपीठ मिळाले पाहिजे.”

शिक्षकांच्या प्रश्नांसाठी सक्षम आवाजाची गरज

पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांतील शिक्षकांच्या विविध प्रश्नांना न्याय देण्यासाठी विधानपरिषदेत सक्षम आणि अभ्यासू आवाज असणे आवश्यक आहे. शिक्षकांचे वेतन व सेवाशर्ती, अनुदानाचे प्रश्न, शैक्षणिक संस्थांच्या अडचणी, शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या आणि प्रशासकीय प्रश्न यांचा सातत्याने पाठपुरावा करण्यासाठी मंगेश चिवटे सक्षम पर्याय ठरू शकतात, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

“मंगेश चिवटे यांनी आतापर्यंत रुग्णसेवेच्या माध्यमातून हजारो गरजू कुटुंबांना आधार दिला आहे. आता त्याच सेवाभावाला शिक्षकांच्या प्रश्नांची जोड मिळाली तर या मतदारसंघातील प्रश्नांना अधिक प्रभावीपणे न्याय देता येईल,” असेही आबिटकर साहेबांनी सांगितले.

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांकडे ठामपणे भूमिका मांडणार

मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीच्या वरिष्ठ नेतृत्वासोबत चर्चा करून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याकडे आपली भूमिका ठामपणे मांडणार असल्याचे आबिटकर साहेबांनी सांगितले.

“मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीचा विषय आम्ही गांभीर्याने मांडणार आहोत. शिक्षक समाजासाठी काम करण्याची त्यांची तळमळ, रुग्णसेवेतील त्यांचा अनुभव आणि सर्वसामान्यांशी असलेला त्यांचा जनसंपर्क लक्षात घेता त्यांना संधी मिळावी, यासाठी आम्ही निश्चितपणे पाठपुरावा करू,” अशी स्पष्ट ग्वाही आरोग्यमंत्री प्रकाशजी आबिटकर साहेबांनी दिली. त्यामुळे पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीतील नेत्यांकडून होत असलेला पाठपुरावा अधिक निर्णायक ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

“रुग्णसेवेचा अनुभव, शिक्षकांच्या प्रश्नांची जाण आणि सर्वसामान्यांचा विश्वास — या ताकदीच्या जोरावर मंगेश चिवटे यांना शिक्षक समाजाचा आवाज बनविण्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू,” असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Post a Comment

0 Comments