मतदारांनी गणना
प्रपत्र भरून द्यावे
बीएलओंना सहकार्य करण्याचे नगराध्यक्ष अमोल मोहिते यांचे आवाहन
सातारा | प्रतिनिधी
भारत निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण (Special Intensive Revision – SIR) अभियानांतर्गत मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत सातारा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी स्वतःचे गणना प्रपत्र भरून संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर करत नागरिकांसमोर आदर्श निर्माण केला.
यावेळी नगराध्यक्ष मोहिते यांनी शहरातील सर्व पात्र मतदारांना वेळेत गणना प्रपत्र भरून देण्याचे आवाहन केले. तसेच बूथ लेव्हल अधिकारी (BLO) घरोघरी जाऊन मतदार पडताळणीचे काम करत असल्याने नागरिकांनी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देत त्यांना पूर्ण सहकार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.
मतदार यादीचे पुनर्निरीक्षण ही लोकशाही प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाची बाब असून, प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत अचूकपणे समाविष्ट राहणे आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी अचूक माहिती देऊन गणना प्रपत्र वेळेत भरावे, जेणेकरून मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि सर्वसमावेशक होण्यास मदत होईल, असे नगराध्यक्ष मोहिते यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले. तसेच मतदार पडताळणी प्रक्रियेत कोणत्याही अडचणी आल्यास संबंधित बीएलओ किंवा निवडणूक प्रशासनाशी संपर्क साधण्याचेही त्यांनी सांगितले.
शहरातील सर्व नागरिकांनी विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून गणना प्रपत्र भरावे, बीएलओंना आवश्यक सहकार्य करावे आणि लोकशाही अधिक सक्षम, पारदर्शक व सर्वसमावेशक करण्यासाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी केले.


0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!