साताऱ्याला स्वच्छ, सुंदर, सुरक्षित शहर बनवूया
नगराध्यक्ष अमोल मोहिते व उपनगराध्यक्ष ॲड. डी. जी. बनकर यांनी दिल्या सातारकरांना शुभेच्छा..!
सातारा : 1 मे महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन. या दोन्ही ऐतिहासिक दिवसांच्या निमित्त नगराध्यक्ष अमोल मोहिते व उपनगराध्यक्ष मा. ॲड. डी.जी.बनकर यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.
शुभेच्छा देताना पुढे म्हटले आहे की, 1 मे 1960 रोजी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातून आपले मराठी राज्य अस्तित्वात आले. 105 हुतात्म्यांच्या बलिदानाने मिळालेला हा महाराष्ट्र आज देशाच्या प्रगतीचा कणा बनला आहे. छत्रपती शिवरायांची शौर्यभूमी असलेल्या आपल्या साताऱ्याला या महाराष्ट्राच्या जडणघडणीत अनन्यसाधारण महत्त्व आहे.
कामगार दिन हा श्रमाला आणि श्रमिकाला सलाम करण्याचा दिवस आहे. आपली सातारा नगरपरिषद ही खऱ्या अर्थाने तुमच्या कष्टावरच उभी आहे. पहाटे उठून शहर स्वच्छ करणारा सफाई कर्मचारी असो, 24 तास पाणीपुरवठा सुरळीत ठेवणारा कर्मचारी असो, कार्यालयात फाईल हलवणारा सेवक असो किंवा आरोग्य सेवेत तत्पर असणारा कर्मचारी असो - तुम्ही सर्वच या शहराचे खरे आधारस्तंभ आहात.
तुमच्यामुळे सातारा स्वच्छ राहतो, सुंदर दिसतो. उन्हातान्हात, पावसात, सणासुदीतही आपण कर्तव्य बजावता याबद्दल मी तुमचा मनापासून ऋणी आहे. आपण सर्व एक कुटुंब आहोत आणि साताऱ्याच्या विकासासाठी एकदिलाने काम करूया.
महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी ज्यांनी बलिदान दिले, त्यांच्या स्वप्नातला पुरोगामी आणि समृद्ध महाराष्ट्र घडवूया. साताऱ्याला स्वच्छ, सुंदर, सुरक्षित शहर बनवूया, असे मनोगत सातारा नगर परिषदेमधील ध्वजारोहण कार्यक्रमाचे वेळी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांनी व्यक्त केले.
ध्वजारोहण कार्यक्रमाचे वेळी आरोग्य सभापती धनंजय जांभळे, महिला बालकल्याण सभापती मोनिका घोरपडे, उपसभापती सुजाता गिरिगोसावी, नगरसेविका आशा डागळे, अर्चना कांबळे, शांता कोळी, वैशाली राजेभोसले, रीना भणगे, जयश्री जाधव, अपर्णा बाचल, अनिता फरांदे,नगरसेवक शंकर माळवदे, दिलीप म्हेत्रे, सुशांत महाजन, मुख्याधिकारी विनोद जळक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!