महू धरण परिसरात बिबट्याच्या
दर्शनाने नागरिकांमध्ये भीती
रांजणी येथील रहिवासी सुदैवाने बचावला
सातारा : महू धरण परिसरात वहागाव हद्दीत शुक्रवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास वहागाव, रांजणी गावातील नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाले. रांजणी येथील रहिवासी दत्तात्रेय कासुर्डे हे करहरहून वहागाव मार्गे आपल्या गावी जात असताना त्यांना भिंतीजवळच बिबट्याचे दर्शन झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले. कासुर्डे यांच्या मोटारसायकल समोरूनच बिबट्या गेल्याने ते भयभीत झाले. त्यांनी ही घटना वहागाव येथील नागरिकांना व पोलीस पाटील किरण जंगम यांना सांगितली.
महू धरण परिसरात गेल्या १६ दिवसांपासून या बिबट्याचे अधूनमधून दर्शन होत आहे. त्याचे वास्तव्य महू धरणाच्या भिंतीजवळील दाट झाडीत असल्याचे नागरिकांनी सांगितले. गेल्या दोन महिन्यांपासून हा बिबट्या सुलेवाडी, घोटेघर, आखेगणी, रांजणी व वहागाव परिसरात अधूनमधून नागरिकांना दिसत आहे. यादरम्यान गावातील पाळीव जनावरे, कुत्रे शेळ्या आदी प्राण्यांवर हल्ला करून त्यांना फस्त केले आहे.
या घटनेची दखल वन विभागाने घ्यावी, तसेच धरण परिसर, पंचक्रोशीतील ग्रामस्थ व पर्यटकांनी महू धरण परिसरात व भिंतीवर कोणीही सायंकाळी उशिरा फिरण्यास अथवा अन्य कारणासाठी जाऊ नये, गरज पडल्यास काळजीपूर्वक समूहाने प्रवास करावा. आपल्या सुरक्षितेचेही काळजी घ्यावी, असे आवाहन पंचक्रोशीतील नागरिकांनी केले आहे.

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!