महासंचालक ब्रिजेशसिंह यांचे
राजा माने यांनी मानले आभार!
मुंबई : महाराष्ट्रातील डिजिटल मिडियाला शासकीय जाहिराती देण्यासंदर्भात "मार्गदर्शक सूचना अधिसूचना" जारी करून राज्यातील डिजिटल पत्रकारांना राजमान्यता दिल्याबद्दल राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक ब्रिजेशसिंह यांचे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना व तमाम डिजिटल पत्रकारांच्या वतीने खास सोलापुरी नॅपकिन गुच्छ देऊन आभार मानले.
आज मंत्रालयात ब्रिजेशसिंह यांच्या दालनात राजा माने यांनी भेट घेतली. मंगळवार, दि.३ जून २०२५ रोजी राज्य शासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमधील अनेक मुद्द्यांवर ब्रिजेशसिंह यांच्याशी चर्चा झाली. डिजिटल पत्रकारिता आणि डिजिटल पत्रकारांच्या विकासासाठी शासन अनुकूल असल्याची ग्वाही त्यांनी दिली. राजमान्यतेचे द्वार खुले करण्याची ऐतिहासिक जबाबदारी राज्य सरकारने पार पाडल्याबद्दल माहिती व जनसंपर्क विभाग, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्र्यांनी एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच डिजिटल पत्रकारांच्या चळवळीला गेल्या सहा वर्षांपासून बळ देणारे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे राजा माने यांनी आभार मानले.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!