फुले आंबेडकर साहित्य पुरस्कार
सुखदेव थोरात, रामभाऊ जाधव,
नारायण जावलीकर यांना जाहीर
शरदचंद्र पवार, श्रीनिवास पाटील यांच्या उपस्थितीत दि. 9 मे रोजी वितरण
भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण माने यांची माहिती
सातारा : येथील भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्था व फुले - आंबेडकर साहित्य पंचायत सातारा या संस्थांच्या वतीने देण्यात येणारा फुले आंबेडकर साहित्य पुरस्कार देशातील थोर विचारवंत, अर्थशास्त्रज्ञ, विद्यापीठ आयोगाचे माजी अध्यक्ष युजीसी चेअरमन अध्यक्ष पदमश्री डॉ. सुखदेव थोरात यांना, भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे सरचिटणीस रामभाऊ जाधव यांना जीवन गौरव पुरस्कार, तर युवा साहित्यिक पुरस्कार लेखक नारायण जावलीकर यांना जाहीर करण्यात आले आहेत. हे पुरस्कारांचे वितरण संस्थेचे अध्यक्ष, खा. शरदचंद्र पवार यांच्या हस्ते व माजी खासदार श्रीनिवास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दि. 9 मे रोजी शारदाश्रम, जकातवाडी येथे होणार असल्याची माहिती भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे अध्यक्ष, माजी आमदार, उपराकार लक्ष्मण माने यांनी दिली.
उपराकार लक्ष्मण माने म्हणाले, भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्था, सातारा फुले आंबेडकर साहित्य पंचायत सातारा या संस्थांच्या वतीने देण्यात येणारा फुले - आंबेडकर साहित्य पुरस्कार देशातील थोर विचारवंत, अर्थशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ञ, प्राध्यापक, लेखक, विद्यापीठ आयोगाचे माजी अध्यक्ष युजीसी चेअरमन अध्यक्ष पदमश्री डॉ. सुखदेव थोरात यांना जाहीर करण्यात आला आहे. त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये 70 शोधनिबंध लिहून प्रकाशित केले आहेत. त्यांनी 25 हून अधिक संशोधन प्रकल्पांवर काम केले आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चासत्रे आणि परिषदांमध्ये पेपर्स सादर केले आहेत. नियोजन आयोगाचे, सामाजिक न्याय विभाग दिल्ली, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, बुध्दीस्ट स्टडीज सेंटर, हैदराबाद विद्यापीठ, हिमाचल प्रदेश विद्यापीठाचे आणि इतर अनेक संस्थांच्या प्रशासकीय मंडळामध्ये सदस्य म्हणून काम केले आहे. देशाच्या जडणघडणीमध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या आतापर्यंतच्या कामाची दखल घेवून यंदाचा फुले - आंबेडकर साहित्य पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आला आहे.
भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे सरचिटणीस व निवृत्त शिक्षक रामभाऊ जाधव यांना संघटनेचा जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. रामभाऊ जाधव हे शिक्षक म्हणून काम करत असताना भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे त्यांनी अहोरात्र झटून काम केले आहे. गेली 40 वर्षे ते भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे क्रियाशील कार्यकर्ते आहेत. म्हणून त्यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
या वर्षीचा युवा साहित्यिक पुरस्कार "रणात आहेत झुंजणारे अजून काही" याचे लेखक मा. नारायण जावलीकर यांना जाहीर करण्यात आला आहे. ते भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे जनरल सेक्रेटरी आहेत. त्यांनी भटक्या विमुक्त जमातीच्या प्रश्नांमध्ये ज्यांनी योध्दे म्हणून काम केले अशा कार्यकर्त्यांच्या कामाची तत्कालीन प्रश्नांची नोंदी पुस्तकात घेतलेल्या आहेत.
या पुरस्कारांचे वितरण संस्थेचे अध्यक्ष मा. खा. शरदचंद्र पवार यांच्या हस्ते व माजी खासदार श्रीनिवास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दि. 9 मे 2025 रोजी शारदाश्रम, जकातवाडी सातारा येथे दुपारी 2:00 वाजता संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे अध्यक्ष, माजी आमदार व उपराकार लक्ष्मण माने, मच्छिंद्रनाथ जाधव व खजिनदार हरिदास जाधव यांनी आहे.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!