लिंब (ता. सातारा) येथे आयोजित महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन करताना शिवसेना उप जिल्हाप्रमुख संदीप दादा पवार , समवेत चंद्रकांत दादा जाधव रोहित कटके, राजेश शेटे आदी.
एकनाथ शिंदे म्हणजे लोकांच्या
वेदना समजून घेणारा नेता..! :
उपजिल्हाप्रमुख संदीपदादा पवार
लिंब प्राथमिक आरोग्य केंद्रात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवस साजरा
सातारा : आजकाल वैद्यकीय कारणासाठी लोकांचा पैसा मोठ्या प्रमाणात खर्च होत असून हा भार पेलवण्याच्या पलीकडे असतो. लोकांच्या या वेदना समजून घेणारा आणि त्यांना तातडीने दर्जेदार आरोग्यसेवा मिळवून देण्यासाठी झटणारा नेता म्हणजे एकनाथ शिंदे असे उद्गार शिवसेना सातारा उपजिल्हाप्रमुख संदीप दादा पवार यांनी यांनी काढले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त लिंब (ता. सातारा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शिवसेना तालुकाप्रमुख रोहित कटके यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी जिल्हाप्रमुख चंद्रकांतदादा जाधव , लिंब विकास सेवा सोसायटीचे चेअरमन प्रदीप पाटील आदिंची प्रमुख उपस्थिती होती. लिंब व परिसरातील सुमारे चारशे गावकऱ्यांनी शिबिराचा लाभ घेतला.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!